घरक्रीडाIPL 2023 : धोनीची टीम CSK वर बंदीची मागणी; स्थानिक खेळाडूंना संधी...

IPL 2023 : धोनीची टीम CSK वर बंदीची मागणी; स्थानिक खेळाडूंना संधी न दिल्याचा होतोय आरोप

Subscribe

नवी दिल्ली : आयपीएल 2023 (IPL 2023) सुरू झाल्यापासून देशभरताली क्रिकेट चाहते क्रिकेट सामन्यांचा आनंद लुटत आहेत. नवीन नियमांमुळे आयपीएलच्या 16 व्या हंगामात रोमांचक सामने होत असल्यामुळे आणखी मजा येत आहे. प्रत्येक हंगामाप्रमाणे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) संघ चेन्नई सुपर किंग्जवर (Chennai Super Kings) आहेत. मात्र, तामिळनाडूच्या एका आमदाराने सीएसकेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

तामिळनाडूमधील धर्मपुरीचे पीएमके आमदार एसपी व्यंकटेश्वरन यांनी चेन्नई सुपर किंग्जच्या फ्रँचायझीकडे कोणतेही स्थानिक खेळाडू नसल्याचा आरोप करत बंदी घालण्याची राज्य सरकारला विनंती केली आहे. मंगळवारी (11 एप्रिल) विधानसभेत क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या अनुदानाच्या मागणीदरम्यान पीएमके आमदारांनी ही मागणी केली. माध्यमांसमोर आपल्या मागणीचा पुनरुच्चार करताना त्यांनी सांगितले की, मी विधानसभेत केवळ जनतेच्या भावनांबद्दल सांगितले आहे.

- Advertisement -

त्यांनी सांगितले की, चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे आणि आमचे नेते अय्या (डॉ. रामादोस) यांनी ‘इन सर्च ऑफ तमिळ’ ही मोहीम राबवली आहे. या मोहीमेमुळे तरुणांमध्ये तमिळ भाषेच्या रक्षणाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अशावेळी अनेकांनी माझ्याशी संपर्क साधत सांगितले की, संघाचे नाव चेन्नई असे असूनही हा संघ प्रतिभावान स्थानिक खेळाडूंना संधी देत ​​नाही आहे. त्यामुळे ते दुःखी असून त्यांनी चेन्नई संघावर बंदी घातली पाहिजे, असे मला सांगितले.

पीएमके आमदारांनी सांगितले की, मी विधानसभेत लोकांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चेन्नई संघ तामिळनाडूचे प्रतिनिधीत्व करत असल्याने ते आमच्या लोकांद्वारे नफा कमावत आहेत, पण संघात तामिळनाडूच्या एकाही खेळाडूंला संधी देण्यात आलेली नाही. माझ्या राज्यातील काही खेळाडूंनी संघाचा भाग व्हावे, अशी माझी इच्छा आहे,” असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

सीएसके संघ – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार अखिल देशपांडे, पट्टान देशपांडे, सिमरजीत सिंग, दीपक चहर, प्रशांत सोलंकी, महेश थिक्शाना, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधू, सिसांडा मगला, अजय मंडल, भगत वर्मा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -