Maharashtra Assembly Election 2024
घरक्रीडाCSK vs RCB : आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्ससाठी लाभदायक; पाहा रेकॉर्ड्स...

CSK vs RCB : आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्ससाठी लाभदायक; पाहा रेकॉर्ड्स काय सांगतात?

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 पर्वाची सुरु होण्यास आता काही तास शिल्लक आहे. गतविजेचा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्याने आयपीएलची सुरूवात होणार आहे. यंदाच्या पर्वात चेन्नईचे नेतृत्त्व आता मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याच्याकडे तर बंगळुरुचे नेतृत्त्व फाफ डु प्लेसिस करत आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 पर्वाची सुरु होण्यास आता काही तास शिल्लक आहे. गतविजेचा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्याने आयपीएलची सुरूवात होणार आहे. यंदाच्या पर्वात चेन्नईचे नेतृत्त्व आता मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याच्याकडे तर बंगळुरुचे नेतृत्त्व फाफ डु प्लेसिस करत आहे. मात्र आजचा सामना हा चेन्नई विरुद्ध बंगळुरू यांच्यात असला तरी, मुंबई इंडियन्ससाठी चांगले संकेत मानले जात आहेत. (ipl 2024 rcb and csk opening match good signs for mumbai indians)

2019 च्या आयपीएलची सुरुवात 2018 च्या आयपीएलची विजेती टीम चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाली होती. चेन्नईनं 2019 च्या आयपीएलच्या पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्सचा 7 विकेटनं धुव्वा उडवला होता. चेन्नईच्या बॉलर्सपुढं आरसीबीची टीम 18 ओव्हर्समध्ये 70 धावांवर बाद झाली होती. यानंतर चेन्नईनं 18 ओव्हर्समध्ये 3 विकेट गमावून 71 धावा केल्या होत्या. चेन्नईनं 2019 च्या आयपीएलची सुरुवात विजयाने केली होती. मात्र अंतिम फेरीत मुंबईकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आयपीएलच्या 2019 च्या पर्वात अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत झाली होती. त्या लढतीत मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेट गमावत 149 धावा केल्या होत्या. त्यानंतर मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावत 148 धावा करता आल्या होत्या. परिणामी मुंबईने एका रनने आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरले होते.

- Advertisement -

आजचा सामना कुठे होणार?

आजचा सामना एमए चिदंबरम स्टेडीअम होणार आहे. या सामन्यापूर्वी आयपीएलच्या 17 व्या पर्वाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात अभिनेता अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि प्रसिद्ध गायक एआर रहमान यांसारखे दिग्गज समावेश घेणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स (CSK) : ऋतुराज गायकवाड़ (कप्तान), महेंद्र सिंह धोनी, मोईन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सेंटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, महीश तीक्ष्णा, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकुर, डेरिल मिचेल, समीर रिजवी, मुस्ताफिजुर रहमान, अवनीश राव अरावली.

- Advertisement -

रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (RCB) : फाफ डु प्लेसिस (कप्तान), ग्लेन मैक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जैक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडगे, मयंक डागर, विजय कुमार वैशाक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉप्ली, हिमांशु शर्मा, राजन कुमार, कैमरन ग्रीन, अल्जारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरेन, लॉकी फर्ग्यूसन, स्वप्निल सिंह, सौरव चौहान.


हेही वाचा – IPL 2024: आयपीएलच्या 17 व्या पर्वापूर्वीच मोठे फेरबदल, या संघात खेळाडूंची अचानक भरती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -