घरक्रीडाIND vs AUS : गुलाबी चेंडूविरुद्ध फलंदाजी करणे अवघड - टीम पेन 

IND vs AUS : गुलाबी चेंडूविरुद्ध फलंदाजी करणे अवघड – टीम पेन 

Subscribe

पेनने ९९ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी केली.

अ‍ॅडलेड येथे सुरु असलेल्या डे-नाईट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगलेच अडचणीत टाकले. त्यामुळे पहिल्या डावात भारताच्या २४४ धावांचे उत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा डाव १९१ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियन संघ १५० हूनही कमी धावा करणार असे एका क्षणी वाटत होते. परंतु, टीम पेनने कर्णधाराला साजेशी खेळी केल्याने ऑस्ट्रेलियाने १९१ अशी धावसंख्या उभारली. पेनने ९९ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात भारतीय संघाच्या धावसंख्येच्या जवळ पोहोचला याचा पेनला आनंद होता. मात्र, गुलाबी चेंडूंविरुद्ध फलंदाजी करणे अवघड होते, असेही पेनने दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर सांगितले.

आम्ही मोठी धावसंख्या करू शकलो नाही, यामागे भारताची अप्रतिम आणि भेदक गोलंदाजी हे प्रमुख कारण होते. या सामन्यात (दोन्ही संघांचे मिळून) पाच-सहा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज खेळत आहेत. ते फलंदाजांना सहजपणे धावा करण्याची संधी देत नाहीत. तसेच गुलाबी चेंडूंविरुद्ध फलंदाजी करणेही अवघड होते. टीव्हीवर सामना पाहताना गुलाबी चेंडू चांगला वाटतो. मात्र, खेळाडूंसाठी या चेंडूने खेळणे सोपे नसते. लाईट सुरु झाल्यावर चेंडू पटकन दिसत नाही, असे पेन म्हणाला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -