घरक्रीडाNZ vs WI : कर्णधार विल्यमसनचे द्विशतक; न्यूझीलंडचा पहिला डाव ५१९ धावांवर...

NZ vs WI : कर्णधार विल्यमसनचे द्विशतक; न्यूझीलंडचा पहिला डाव ५१९ धावांवर घोषित

Subscribe

विल्यमसनने ४१२ चेंडूत ३४ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २५१ धावांची खेळी केली.

कर्णधार केन विल्यमसनने केलेल्या द्विशतकामुळे न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीतील पहिला डाव ७ बाद ५१९ धावांवर घोषित केला. विल्यमसनने ४१२ चेंडूत ३४ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २५१ धावांची खेळी केली. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या ठरली. याआधी त्याने २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद २४२ धावांची खेळी केली होती.

हॅमिल्टन येथे सुरु असलेल्या विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडची २ बाद २४३ अशी धावसंख्या होती. दुसऱ्या दिवशी शॅनन गेब्रियलने दुसऱ्याच षटकात रॉस टेलरला ३८ धावांवर बाद केले. विल्यमसनने मात्र पुढच्याच षटकात त्याचे कसोटी क्रिकेटमधील २२ वे शतक पूर्ण केले. यानंतर किमार रोचने हेन्री निकोल्स (७) आणि डॅरेल मिचेल (९) यांना, तर गेब्रियलने टॉम ब्लंडेलला (१४) माघारी पाठवले.

- Advertisement -

विल्यमसनने मात्र अप्रतिम फलंदाजी सुरु ठेवत ३६९ चेंडूत कसोटीतील आपले तिसरे द्विशतक झळकावले. द्विशतक झाल्यावर विल्यमसनने धावांची गती वाढवली. त्याने २०० ते २५० हा ५० धावांचा टप्पा ४२ चेंडूत पूर्ण केला. अखेर अल्झारी जोसेफने त्याला २५१ धावांवर बाद केले. तो बाद झाल्यानंतर कायेल जेमिसनने नाबाद ५१ धावांची खेळी केल्यावर न्यूझीलंडने पहिला डाव ७ बाद ५१९ धावांवर घोषित केला. याचे उत्तर देताना विंडीजची दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद ४९ अशी धावसंख्या होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -