घरक्रीडाविश्वचषकात कोहली, बटलरवर असेल सर्वांची नजर

विश्वचषकात कोहली, बटलरवर असेल सर्वांची नजर

Subscribe

इंग्लंडमध्ये ३० मेपासून क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. दर विश्वचषकाप्रमाणेच या विश्वचषकातही खेळाडू आणि संघ याकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा असणार. या अपेक्षांच्या दबावात काही खेळाडूंना आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयश येते, तर खेळाडू असे असतात जे हा दबाव योग्यपणे हाताळून दमदार कामगिरी करतात. या विश्वचषकातही असे बरेच खेळाडू आहे, जे आपली छाप पडतील. मात्र, या सगळ्यांतही भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जॉस बटलरवर सार्‍यांची नजर असेल, असे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयन चॅपल यांचे मत आहे.

या विश्वचषकात असे बरेच खेळाडू आहेत, जे आपल्या संघाला विश्वविजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी असेल विराट कोहली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील त्याची कामगिरी अफलातून आहे आणि तो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे तंत्र असे आहे की तो फार फटकेबाजी न करता, फार फटके हवेत न मारताही वेगाने धावा करू शकतो. त्याच्या या तंत्रामुळेच दीर्घकाळ चालणार्‍या स्पर्धेत तो इतरांपेक्षा जास्त यशस्वी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विश्वचषकात कोहलीवर सार्‍यांची नजर असणार आहे. जर भारताला हा विश्वचषक जिंकायचा असेल तर त्याला आणि रोहित शर्माला चांगले प्रदर्शन करावे लागणार आहे, असे चॅपल यांनी सांगितले.

- Advertisement -

तसेच इंग्लंडचा जॉस बटलरही या विश्वचषकात दमदार कामगिरी करेल असे त्यांना वाटते. याविषयी ते म्हणाले, इंग्लंडला पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याची आशा आहे आणि तसे होण्यासाठी त्यांच्या फलंदाजांना दमदार कामगिरी करावी लागणार आहे. या सर्व अप्रतिम फलंदाजांमध्ये जॉस बटलरची कामगिरी त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची असणार आहे. त्यांच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर मधल्या फळीत बटलर हा असा फलंदाज आहे, फटकेबाजी करून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर दबाव टाकू शकतो. तो मैदानाच्या कोणत्याही कोपर्‍यात फटके मारू शकतो. मागील काही काळात त्याचा स्ट्राईक रेट तर क्रिस गेलपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे तो या विश्वचषकात चांगले प्रदर्शन करेल अशी मला अपेक्षा आहे.

वेगवान गोलंदाजांमध्ये भारताचा जसप्रीत बुमराह या विश्वचषकातील सर्वोत्तम गोलंदाज असू शकेल असे चॅपल यांना वाटले. तसेच कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल असे चांगले फिरकीपटू असणे ही भारताची जमेची बाजू आहे असे चॅपल यांचे मत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -