घरक्रीडाविश्वचषकात भारताचे तीन समालोचक

विश्वचषकात भारताचे तीन समालोचक

Subscribe

इंग्लंडमध्ये होणार्‍या क्रिकेट विश्वचषकासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) समालोचकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर आणि प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले या तीन भारतीयांचा समावेश आहे.

मागील (२०१५) विश्वचषक जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार मायकल क्लार्क आणि त्याच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणार्‍या न्यूझीलंड संघाचा कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम हेसुद्धा या विश्वचषकात समालोचन करताना दिसणार आहेत. ३० मेपासून सुरू होणार्‍या या विश्वचषकात भारताचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार असून, या विश्वचषकात प्रत्येक संघ इतर ९ संघांशी सामना खेळणार आहे.

- Advertisement -

समालोचकांची यादी –

सौरव गांगुली, संजय मांजरेकर, हर्षा भोगले, नासिर हुसेन, इयन बिशॉप, मेलेनी जोन्स, कुमार संगकारा, मायकल अ‍ॅथर्टन, अ‍ॅलिसन मिचेल, ब्रेंडन मॅक्युलम, ग्रॅहम स्मिथ, वसिम अक्रम, शॉन पोलॉक, मायकल स्लेटर, मार्क निकलस, मायकल होल्डींग, इशा गुहा, पॉमी एमबान्ग्वा, सायमन डुल, इयन स्मिथ, रमीझ राजा, अथर अली खान आणि इयन वार्ड.

- Advertisement -

समालोचन करण्यासाठी उत्सुक – मॅक्युलम

विश्वचषक ही अजूनही क्रिकेटमधील सर्वात मोठी आणि मानाची स्पर्धा आहे. विश्वचषकाने मला खूप चांगल्या आठवणी दिल्या आहेत. २०१५ विश्वचषक ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची स्पर्धा होती आणि आता यावेळी एका वेगळ्या रूपात काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. या विश्वचषकात रंगतदार सामने होतील, अशी मला आशा आहे, असे ब्रेंडन मॅक्युलम म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -