घरक्रीडालिएंडर पेस अडचणीत, घरगुती हिंसाचार प्रकरणी कोर्टाने ठरवले दोषी

लिएंडर पेस अडचणीत, घरगुती हिंसाचार प्रकरणी कोर्टाने ठरवले दोषी

Subscribe

भारताचा माजी टेनिसपटू लिएंडर पेस हा गेल्या काही दिवसांपासून आपली गर्लफ्रेंड किम शर्मासोबतच्या फोटोंमुळे चर्चे आहेत. लिएंडरला मुंबईच्या मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने अभिनेत्री मॉडेल रिया पिल्लईच्या घरगुती हिंसाचारासाठी दोषी आढळल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लिएंडर पेससमोरील अडचणीत भर पडणार आहे.

रिया पिल्लईने लिएंडर पेसविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार केली होती. रियाने हे प्रकरण २०१४ मध्ये नोंदवले होते. या प्रकरणात जवळपास ८ वर्षांनंतर निकाल आला आहे. कोर्टाने १ लाख महिन्याची पोटगी सुनावतानाच, ५० हजार रूपये भाड्याच्या स्वरूपात देण्याचे आदेश दिले आहेत. रिया पिल्लई ही बॉलिवुड एक्टर संजय दत्तची पूर्व पत्नी आहे. दोघांनी १९९८ मध्ये लग्न केले होते. पण हे लग्न जास्त काळ टिकले नाही. २००८ मध्ये त्यांच्यात घटस्फोट झाला आहे. संजय दत्त आणि रियाच्या घटस्फोटाच्या आधीच रिया आणि लिएंडर स्पेस यांच्यात अफेअर सुरू झाले. लिएंडर पेसने बॉलीवुड अभिनेत्री महिमा चौधरीलाही डेट केले आहे.

- Advertisement -

किम शर्माला लिएंडर पेस करतोय डेट

गेल्या काही दिवसांपासून लिएंडर पेस हा किम शर्मासोबत अनेक फोटोंमध्ये दिसतो आहे. दोघांनीही आपल्यात नात असल्याचे स्पष्ट केले आहे. तेव्हापासूनच हे कपल सोशल मिडियावर सातत्याने एकत्र दिसते आहे. काही दिवसांपूर्वी हे कपल डिस्नेलॅंड फिरायला गेले होते. त्यावेळी काढलेले फोटोही या दोघांनी फॅन्ससोबत शेअर केले आहेत. त्याशिवाय किम शर्माने आपला वाढदिवसही पेससोबत साजरा केला होता.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -