घरक्रीडाMumbai Indians Captain : रोहितला पुन्हा मुंबईचे कर्णधार करा; माजी खेळाडूची मागणी

Mumbai Indians Captain : रोहितला पुन्हा मुंबईचे कर्णधार करा; माजी खेळाडूची मागणी

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 3 सामने गमावले आहेत. तीन सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाला चांगली खेळी करता आली नाही. त्यामुळे मुंबईचे चाहते नाराज आहेत. त्यात रोहित शर्मा याला कर्णधार पदावर काढत अष्टपैलू हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने चाहते संताप व्यक्त करत आहेत.

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 3 सामने गमावले आहेत. तीन सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाला चांगली खेळी करता आली नाही. त्यामुळे मुंबईचे चाहते नाराज आहेत. त्यात रोहित शर्मा याला कर्णधार पदावर काढत अष्टपैलू हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने चाहते संताप व्यक्त करत आहेत. अशात भारतीय संघाचा माजी खेळाडू मनोज तिवारी याने रोखठोक विधान करत रोहित शर्माला पुन्हा कर्णधार करण्याची मागणी केली आहे. (Mumbai Indians Captain IPL 2024 Give Again Captaincy To Rohit Sharma Says Manoj Tiwary)

आयपीएलचे 17 वे पर्व सुरू असून 14 सामने आतापर्यंत झाले आहेत. या पर्वात मात्र मुंबईने तीन सामने गमावले आहेत. मुंबईचा 1 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध या 17 व्या हंगामातील तिसरा पराभव ठरला. मुंबईला आधी गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबादकडून पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे रोहित शर्मा याला पुन्हा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन करावं, असं टीम इंडियाचा माजी खेळाडू मनोज तिवारी म्हणाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IPL Dates 2024 : आयपीएलच्या स्पर्धेत रंगत येताच 2 सामन्यांच्या तारीखेत बदल; वाचा सविस्तर

नेमकं काय म्हणाला मनोज तिवारी?

“रोहित शर्माकडे मुंबईच्या कर्णधारपदाची जबबादारी द्यायला हवी. मुंबईच्या सर्वेसर्वांना निर्णय घेताना कोणतीही अडचण होत नाही, हे यावरुन मला समजले. त्यांनी निर्णय करुन रोहितला हटवून हार्दिकला कर्णधार केले. रोहितने मुंबईला आपल्या नेतृत्वात 5 आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. कर्णधार बदलणे मोठा निर्णय आहे. मुंबईला या पर्वात पॉइंट्स मिळवता आले नाही आहे. कॅप्टन्सी सर्वच ठिकाणी आहे. असे नाही की हार्दिकची कॅप्टन्सी चांगली आहे आणि नशिबाची साथ नाही. हार्दिकची कॅप्टन्सी चांगली राहिली नाही”, असे मनोज तिवारी म्हणाला.

- Advertisement -

हार्दिक पंड्या याला गुजरात टायटन्समधून ट्रेड करुन मुंबईत घेण्यात आलं. त्यानंतर हार्दिकला रोहित शर्मा याला हटवून कर्णधार करण्यात आलं. मात्र हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईच्या कामगिरीचा आलेख कोसळला. हार्दिकला आपल्या नेतृत्वात मुंबईला 17 व्या हंगामात 3 पैकी एकही सामन्यात विजय मिळवून देता आला नाही. मुंबईचा राजस्थान विरुद्ध पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मनोज तिवारी याने क्रिकबझसोबत बोलताना रोखठोक विधान केलं आहे.


हेही वाचा – IPL 2024: हार्दिकला रोहित शर्माचा पाठिंबा, चाहत्यांना केले हे आवाहन, पाहा व्हिडिओ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -