घरक्रीडाMI vs RCB Playing XI : प्ले-ऑफमधील प्रवेशासाठी मुंबई-बंगळुरूच्या संघाच बदल निश्चित;...

MI vs RCB Playing XI : प्ले-ऑफमधील प्रवेशासाठी मुंबई-बंगळुरूच्या संघाच बदल निश्चित; अशी असेल प्लेईंग 11

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वातील आजचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना होणार आहे. या सामन्यात मुंबई दुसऱ्या विजयासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे आयपीएल 2024च्या गुणतालिकेत तळाशी असलेल्या दोन संघामध्ये हा सामना होणार आहे. त्यामुळे दोघांसाठी आजचा विजय महत्त्वाचा आहे.

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वातील आजचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना होणार आहे. या सामन्यात मुंबई दुसऱ्या विजयासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे आयपीएल 2024च्या गुणतालिकेत तळाशी असलेल्या दोन संघामध्ये हा सामना होणार आहे. त्यामुळे दोघांसाठी आजचा विजय महत्त्वाचा आहे. पण यासामन्यात दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी असणार हे देखील महत्त्वाचे असणार आहे. कारण मागील तीन सामन्यांतील पराभवानंतर मुंबई इंडियन्सने चौथ्या सामन्यात अनेक बदल करत दिल्ली विरुद्धचा सामना जिंकला. त्यानुसार आजच्या सामन्याकरीता ही मुंबई इंडियन्स प्लेईंग 11 मध्ये काही बदल करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (mumbai indians vs royal challengers bangluru players playing 11 in today match)

मुंबईचा संघ कसा असेल?

मुंबई इंडियन्स यंदाच्या गुणतालिकेत 2 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही एका विजयासह म्हणजे चार गुणांसह नवव्या स्थानावर आहे. दरम्यान, आयपीएलच्या तीन सामन्यांतील पराभवानंतर चौथ्या सामन्यात मुंबईच्या संघाला पहिला विजय मिळला. यासामन्याकरीता मुंबईच्या संघात सूर्यकुमार यादव याला संधी देण्यात आली होती. परंतू, पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाल्याने आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादव चांगली फलंदाजी करेल, अशी आशा आहे. तसेच, तिलक वर्मा, टीम डेविड आणि हार्दिक पांड्या मध्यल्या फळीकरीता खेळी करत संघाचा डाव सावरतील. तसेच, रोमिरियो शेफर्ड आणि मोहम्मद नबी यांच्यासह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोइत्जे हे बंगळुरूच्या फलंदाजांचा समाचार घेतील. त्याचप्रमाणे पियूष चावला आपल्या फिरकीने सर्वाधिक गडी बाद करण्याचा प्रयत्न करेल.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Indians : अखेर जिंकलेच! तीन सामन्यांच्या पराभवानंतर घरच्या मैदानावर मुंबईचा पहिला विजय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ कसा असेल?

आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघात बदल होण्याची शक्यता अधिक आहे. कॅमरुन ग्रीन याच्या जागी इंग्लंडच्या विल जॅक्स याला संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवाय रीस टॉप्लेच्या जागी लॉकी फर्गुसन याला आज संधी मिळण्याची शक्यता आहे. बंगळुरूकडून फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली सलामीला उतरतील. त्यानंतर रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कार्तिक,अनुज रावत यांच्यावर मध्यल्या फळीची जबाबदारी असेल.

- Advertisement -

मुंबईची संभाव्य प्लेईंग 11 : रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेविड, हार्दिक पांड्या, रोमारियो शेफर्ड, मोहम्मद नबी, गेराल्ड कोइत्जे, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह

बंगळुरुची संभाव्य प्लेइंग 11 : फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमरून ग्रीन/विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, मयंक डागर, रीस टॉपले/लॉकी फर्गुसन आणि मोहम्मद सिराज.


हेही वाचा – IPL 2024: हार्दिक पांड्याच्या भावाला अटक; बिझनेसमध्ये भावानेच फसवलं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -