घरक्रीडाUS OPEN 2018: नदालची उपांत्य फेरीत धडक

US OPEN 2018: नदालची उपांत्य फेरीत धडक

Subscribe

वर्षाचा शेवटचा ग्रँड स्लॅम अमेरिकन ओपनच्या उप-उपांत्य फेरीत पहिल्या सीडेड राफेल नदालने डॉमिनिक थीम याचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

स्पेनचा आघाडीचा टेनिसपटू राफेल नदालने डेन्मार्कच्या डॉमिनिक थीमचा ०-६, ६-४, ७-५, ६-७ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

थीमची अप्रतिम सुरूवात 

या सामन्याची सुरूवात नदालसाठी अत्यंत खराब झाली. त्याला पहिल्या सेटमध्ये एकही गेम जिंकता आला नाही. त्यामुळे त्याने हा पहिला सेट ०-६ असा गमावला.

नदालचे पुनरागमन

दुसऱ्या सेटमध्ये त्याने चांगले पुनरागमन केले. या सेटमध्ये ४-३ अशी नदालकडे आघाडी असताना त्याने थीमची सर्विस मोडली. त्यानंतर नदालने थीमला आपली सर्विस मोडू दिली नाही. त्यामुळे त्याने हा सेट ६-४ असा जिंकला. तर तिसऱ्या सेटमध्ये नडालकडे ६-५ अशी आघाडी असताना त्याने थीमची सर्विस मोडत हा सेट जिंकला. तर चौथ्या सेटमध्ये दोन्हीही खेळाडूंनी चांगला खेळ केला. त्यामुळे हा सेट टाय-ब्रेकरमध्ये गेला. हा टाय-ब्रेकर थीमने (७-४) असा जिंकत सेटही जिंकला.

- Advertisement -

या सामन्याचा पाचवा आणि निर्णायक सेट अतिशय चुरशीचा झाला. या सेटमध्ये नदालकडे ५-४ अशी आघाडी असताना त्याला थीमची सर्विस मोडायची संधी होती. पण थीमने नदालला तसे करू दिले नाही. त्यामुळे चौथ्या सेटप्रमाणेच हा सेटही टाय-ब्रेकरमध्ये गेला. यात नदालने ७-५ अशी बाजी मारत पाचवा सेटही जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -