घरक्रीडाआयपीएलसाठी तयार राहावे लागेल - रैना

आयपीएलसाठी तयार राहावे लागेल – रैना

Subscribe

लवकरच आयपीएल होईल असे सर्वांना वाटत आहे. त्यामुळे आम्ही तयारीला लागले पाहिजे, असे रैना म्हणाला.

ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषक लांबणीवर पडल्याने बीसीसीआयसाठी अखेर आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयपीएलचा तेरावा मोसम यंदा २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये पार पडण्याची शक्यता आहे. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच होणे अपेक्षित आहे. मात्र, आयपीएल कधी होणार याची खेळाडूंना फारशी चिंता करण्याची गरज नसून त्यांनी आपल्या फिटनेस आणि सरावावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज सुरेश रैनाला वाटते.

मानसिकदृष्ट्या कणखर झाले पाहिजे

फ्रेंचायझीस त्यांचे काम करत आहेत, आम्ही आमचे काम केले पाहिजे. आम्हाला जेव्हा खेळण्यासाठी सांगितले जाईल, तेव्हा आम्ही तयार असले पाहिजे. खेळाडूंनी आता सरावावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच खेळाडू म्हणून आम्ही मानसिकदृष्ट्या आता अधिक कणखर झाले पाहिजे. आता लवकरच आयपीएल होईल असे सर्वांना वाटत आहे. त्यामुळे आम्ही तयारीला लागले पाहिजे आणि पुन्हा खेळण्यासाठी तयार असे पाहिजे, असे रैनाने एका मुलाखतीत सांगितले.

- Advertisement -

सरावासाठी थोडा वेळ लागेल

खेळाडूंना पुन्हा सामने खेळण्याइतपत फिट होण्यासाठी किमान तीन-चार आठवडे सराव करावा लागेल. आयपीएल आजपासून २०-३० दिवसांनी होणार असेल, तर आम्हाला सरावासाठी थोडा वेळ लागेल. मी आता जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असणाऱ्या मोहम्मद शमीसोबत सराव करणार आहे. फलंदाज आणि गोलंदाजात मैत्री असली पाहिजे, असे रैना गमतीत म्हणाला. रैनाने आयपीएलमध्ये आतापर्यंत १९३ सामन्यांत ५३६८ धावा केल्या असून आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -