घरताज्या घडामोडीCoronavirus Update in Maharashtra: राज्यात २४ तासांत ८,३६९ नवे रूग्ण; २४६ जणांचा...

Coronavirus Update in Maharashtra: राज्यात २४ तासांत ८,३६९ नवे रूग्ण; २४६ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत ८ हजार ३६९ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत ८ हजार ३६९ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २४६ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख २७ हजार ३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ७ हजार १८८ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ८२ हजार २१७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.७२ % एवढे झाले आहे.

- Advertisement -

तर आज दिवसभरात राज्यात आज २४६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंदकरण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यू दर ३.७५ % एवढा झाला आहे. तसेच, सध्या राज्यात ७ लाख ७९ हजार ६७६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ४५ हजार ७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १६,४०,६४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३ लाख २७ हजार ३१ (१९.९३ टक्के) कोरोना नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, राज्यात आज एकूण १ लाख ३२ हजार २३६ Active रुग्ण आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus Mumbai: मुंबईत आज ९९५ नव्या रुग्णांची नोंद; ६२ मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -