घरक्रीडाप्रत्येक शंकांवर मात करून मी उभा राहीन - उमेश यादव

प्रत्येक शंकांवर मात करून मी उभा राहीन – उमेश यादव

Subscribe

विश्वचषक संघासाठी पर्यायी जलदगती गोलंदाजाची निवड अद्याप संपलेली नसल्यामुळे बीसीसीआयच्या निवड समितीने उमेश यादवला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी उमेशची भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. यावेळी उमेश यादवने आपल्या ट्विटर हँडलवर एक सूचक वक्तव्य करत, आपण मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलणार असल्याचे सांगितले आहे.

२०१८ हे वर्ष उमेश यादवसाठी फारसे चांगले गेले नाही. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी जलदगती गोलंदाजीची धुरा समर्थपणे वाहिली. त्यामुळे कसोटी सामने खेळलेल्या उमेशला मर्यादीत षटकांच्या सामन्यात संधी मिळाली नाही. मात्र रणजी करंडकात विदर्भाकडून चांगली कामगिरी केल्यानंतर निवड समितीने उमेशची टी-२० संघासाठी निवड केली आहे. आपले कौशल्य सिद्ध करण्याची उमेशकडे ही अखेरची संधी असणार आहे.

- Advertisement -

सध्या भारतीय संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांचे स्थान पक्के मानले जात आहे. भारताकडे हार्दिक पांड्या हा एकमेव अष्टपैलू पर्याय उपलब्ध आहे. अशावेळी पर्यायी गोलंदाज म्हणून सिद्धार्थ कौल आणि खलिल अहमद असे दोन पर्याय शिल्लक राहतात. त्यामुळे संघात आपले स्थान पक्के करण्यासाठी उमेश यादवला मिळालेल्या संधीचे सोने करणे गरजेचे बनले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -