घरक्रीडापाक-अफगाण व्दंव्द

पाक-अफगाण व्दंव्द

Subscribe

क्रिकेटलाही आता फुटबॉलप्रमाणे हुल्लडबाजीचे वेध लागले आहेत. वर्ल्डकप स्पर्धेत शनिवारी लीड्सवरील पाकिस्तान-अफगणिस्तान लढतीदरम्यान उभय संघांच्या पाठिराख्यांमध्ये चकमकीचे प्रसंग उद्भवले. हुल्लडबाज प्रेक्षकांना सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढले. हेडिंग्लीवर बलुचिस्तानला पाठिंबा दर्शवणारे बॅनर्स एका विमानातून झळकल्याचे प्रेक्षकांनी पाहिले. अफगाणिस्तानच्या फलंदाजीदरम्यान विमान हेडिंग्लीवरुन उडाले खरे. ‘‘बलुचिस्तानला न्याय मिळावा’’ असा मजकूर या बॅनरवर इंग्लिशमध्ये (जस्टिस फॉर बलुचिस्तान) होता.

स्थानिक संघटन समितीच्या सदस्यांना याबाबत काही माहिती नव्हती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कमिटी (आयसीसी) या सार्‍या प्रकरणाची चौकशी करेल. हेडिंग्लीचा परिसर लीडस् ब्रँडफर्ड एअरपोर्टच्या हद्दीत येतो व वर्ल्डकपदरम्यान कुठल्याही प्रकारचे राजकीय भाष्य करण्यास मनाई असल्याचे आयसीसीतर्फे सांगण्यात आले. स्थानिक पोलिसांमार्फत या प्रकाराची चौकशी करण्यात येईल असेही कळविण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीचे, दंगलीचे प्रकार इंग्लंडला नवीन नाहीत. फुटबॉल सामन्यांदरम्यान प्रेक्षकांमध्ये प्रचंड हाणामारी, हुल्लडबाजी, दंगलीचे प्रकार अनेकदा घडले आहेत. परंतु, क्रिकेटमध्ये हुल्लडबाजीचे प्रकार क्वचितच घडतात. वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडमध्ये असा प्रकार विरळच. हेडिंग्लीवर अफगाणी तसेच पाकिस्तानी हुल्लडबाज प्रेक्षकांना रोखण्यासाठी सुरक्षारक्षकांनी आटोकाट प्रयत्न केले. काही हुल्लडबाज प्रेक्षकांना स्टेडियमबाहेर हुसकावून लावण्यात आले.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया, भारत व पाकिस्तान यांच्याप्रमाणे आता पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यात चुरसपूर्ण, खुन्नस लढती बघायला मिळतील अशी चिन्हे दिसत आहेत. पाकने वर्ल्डकपमधील चुरशीच्या लढतीत अफगाणिस्तानवर ३ विकेट आणि २ चेंडू राखून विजय मिळविला. त्यामुळे त्यांनी आपले आव्हान कायम राखले. सामना सुरु होण्याआधीच हेडिंग्लीवरील वातावरण तापले होते. अंतर्गत यादवीमुळे अफगाणिस्तानातील जनजीवन, दैनंदिन व्यवहारांवर सावट, दडपण असते. अफगणिस्तान क्रिकेट संघाचे सरावशिबीर, तसेच सामनेदेखील नोएडा, डेहराडून येथे खेळले जातात.

- Advertisement -

वर्ल्डकपमधील सामने राजधानी काबूलमधील स्टेडियममध्ये तसेच जलालाबाद येथील अफगाणी जनता मोठ्या पडद्यावर (बिग स्क्रिन) बघत होती. त्यातच अफगाणी कर्णधार गुलबदीन नैबने स्वतःकडे चेंडू घेत ४६ वे षटक टाकले, ज्यात १८ धावा फटकावल्या गेल्या. पाकच्या इमाद वसीमने प्रतिहल्ला चढवत सामना आपल्या बाजूने फिरवला. नैबने वास्तविक राशिद किंवा मुजीबला गोलंदाजी दिली असती तर कदाचित परिस्थिती बदलली असती.

इमादला वहाब रियाझची छान साथ लाभली. त्यांनीच पाकला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांनी अलिकडेच पाकिस्तान भेटीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केली, तसेच लाहोर भेटीत नामवंत कवी इकबाल यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -