घरमहाराष्ट्रST Workers Strike : सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या विचारात?; अनिल परबांनी दिलं...

ST Workers Strike : सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या विचारात?; अनिल परबांनी दिलं सूचक उत्तर

Subscribe

एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात एसटी महामंडळाचं आणि प्रवाशांचं नुकसान होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार सरकार एसटी कर्मचाऱ्यांची नव्याने भरती करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी सूचक उत्तर दिलं आहे. एसटी कामगार कामावर आले नाहीत तर आम्ही अन्य पर्यायांचा विचार करु, असं ॲड. अनिल परब म्हणाले.

ॲड. अनिल परब यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एसटी कामगार कामावर परतले नाहीत तर सरकार वेगळा म्हणजेच नव्या भरती प्रक्रियेचा विचार करणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक उत्तर दिलं. सरकारला एसटी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक आणि पवाशांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे सरकार सर्वच पातळ्यांवर विचार करत आहे. एसटी कामगार कामावर आले नाहीत तर आम्ही अन्य पर्यायांचा विचार करु, असं ॲड. अनिल परब म्हणाले. गुरुवारपर्यंत २ हजार एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. यापुढे ही कारवाई अधिक कडक करु. एसटी कर्मचाऱ्यांचं कधीही न भरुन येणारं हे नुकसान आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत भरुन देणार का? असा सवालही ॲड. अनिल परब यांनी केला.

- Advertisement -

सदाभाऊ खोत, पडळकर संप भडकवण्याचं काम करतायत

आमदार सदाभाऊ खोत आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे संप करणाऱ्यांना एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचं काम करत आहेत, असा आरोप परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी केला. तसंच, खोत आणि पडळकर यांना कामगारांच्या प्रश्नांची जाण नाही. केवळ राजकीय पोळ्या भाजून घेत आहेत, अशी टीका अनिल परब यांनी केली.

सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचं काम करत आहेत. त्यांची जबाबदारी कोणी घेत नाही आहे. कामगारांचं नुकसान झालं तर खोत, पडळकर जबाबदारी घेणार नाहीत. ते हळूहळू संपापासून दूर जातील. कामगारांचा जो प्रश्न आहे तो चर्चेतून सुटू शकतो. सरकारचा गळा दाबून मागण्या मान्य करुन घेऊ शकत नाही, असं ॲड. अनिल परब म्हणाले. तसंच, आतापर्यंत २००० कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांचं किती मोठं नुकसान झालं आहे. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर नुकसान भरुन देणार आहेत का? सणाच्या दिवशी लोकांना वेठीस धरलं. याला जबाबदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर आहेत, असा घणाघात परब यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – सदाभाऊ खोत, पडळकर संप भडकवण्याचं काम करतायत – ॲड. अनिल परब


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -