घरताज्या घडामोडीप्रार्थना,भूषणच्या 'अजिंक्य' चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

प्रार्थना,भूषणच्या ‘अजिंक्य’ चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Subscribe

"अजिंक्य” सिनेमा येत्या १९ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान तसेच प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे चित्रित नव्या धाटणीचा चित्रपट “अजिंक्य” चा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ल्युमिनरी सिने वर्ल्ड आणि एक्झॉटेक मीडिया प्रा. लि. यांनी “अजिंक्य” सिनेमा येत्या १९ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून हा संपुर्ण चित्रपट ग्रामीण आणि नगरी भागांत सातत्याने दिसत असलेल्या आर्थिक परिस्थिती वर भाष्य करणारा चित्रपट आहे.

आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या वेगवान प्रवाहात स्वार असणाऱ्या आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा नायक ”अजिंक्य”च्या संघर्षावर बेतलेला हा सिनेमा आहे. चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये अजिंक्य च्या भूमिकेत असलेल्या भूषण प्रधानचा “कॉर्पोरेट लूक” सर्वांचे लक्ष वेधून घेतो, त्यासोबत असलेली प्रार्थना तितकीच सुंदर आणि सोज्वळ दिसते.

- Advertisement -

या सिनेमात जेष्ठ अभिनेते उदय टिकेकर, अरुण नलावडे, गणेश यादव, अनिकेत केळकर, प्रसाद जवादे, पद्मनाभ बिंब, त्रियुग मंत्री अभिनेत्री वंदना वाकनीस आणि पल्लवी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ल्युमिनरी सिने वर्ल्ड निर्मित आणि एक्झॉटेक मीडिया प्रा. लि. प्रस्तुत ”अजिंक्य” चे निर्माते अरुणकांत शुक्ला, नीरज आनंद, राघवेंद्र के. बाजपेयी, बाबालाल शेख, राहुल लोंढे आणि वेद पी. शर्मा हे असून उमेश नार्वेकर सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.

या सिनेमाचं दिग्दर्शन अ. कदिर यांनी केलं आहे तसेच चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद देखील अ. कदिर यांचे असून अ. कदिर यांचा हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. रोहन- रोहन यांनी दिलेल्या संगीताने या चित्रपटाची शोभा वाढली आहे. “अलगद अलगद”, “स्वप्नांना”, “आता तरी बोल ना” आणि “फेव्हरेट राव” या गाण्यांना चाहतेवर्गाकडून पसंती मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘खुर्ची’ सिनेमातून बालकलाकार आर्यनचे चित्रपटसृष्टीत पदार्पण

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -