घरक्रीडाPAK vs BAN : बांगलादेशविरूध्द पुन्हा फेल बाबर आझम; विश्वचषकानंतर धावांसाठी तरसतोय

PAK vs BAN : बांगलादेशविरूध्द पुन्हा फेल बाबर आझम; विश्वचषकानंतर धावांसाठी तरसतोय

Subscribe

बांगलादेशविरूध्च्या टी-२० मालिकेत बाबर आझमने फक्त २७ धावा केल्या आहेत.

पाकिस्तानचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. दोन्हीही संघामध्ये काही दिवसांपूर्वीच ३ सामन्यांची टी-२० मालिका पार पडली. ज्याच्यात पाकिस्तानने ३-० अशा फरकाने बांगलादेशला चितपट करून मालिकेवर कब्जा मिळवला होता. दरम्यान आता पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना चटगावमध्ये खेळला जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे या पूर्ण बांगलादेशच्या दौऱ्यात पाकिस्तानसाठी निराशाजनक बातमी म्हणजे संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या धावा करण्यासाठी तरसतो आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर दोन्हीही संघाची हि पहिली मालिका आहे. विश्वचषकात चांगली खेळी करणारा बाबर आझम बांगलादेशच्या पूर्ण दौऱ्यात खराब फॉर्मचा सामना करत आहे. टी-२० मालिकेच्या तीनही सामन्यात बाबरने फक्त २७ धावा केल्या आहेत.

टी-२० मालिकेनंतर कसोटी मालिकेत बाबर आझम त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये येईल अशी चर्चा होती. मात्र असे होताना दिसत नाही आहे, चटगावच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात बाबर आझमने ४६ चेंडूत केवळ १० धावा केल्या. तो चांगल्या लयमध्ये खेळण्याचा प्रयत्न करत असतानाच मेहदी हसन मिराजने त्याला बाद केले.

- Advertisement -

बाबर आझमने काही दिवसांपूर्वीच झालेल्या टी-२० विश्वचषकात ६ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्याने चमकदार खेळी करत ४ अर्धशतके केली होती. बाबरने ६ टी-२० सामन्यांत ३०३ धावा केल्या होत्या. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात बाबरने भारताविरूध्द नाबाद ६८ धावा केल्या होत्या.


हे ही वाचा: http://PAK vs WI : पाकिस्तानविरूध्दच्या मालिकेसाठी वेस्टइंडीजच्या संघाची घोषणा;या नवीन खेळांडूंना मिळाली संधी

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -