घरक्रीडाPAK vs NZ : पदार्पणात नौमन अलीचा भेदक मारा; पहिल्या कसोटीत पाकिस्तान विजयी ...

PAK vs NZ : पदार्पणात नौमन अलीचा भेदक मारा; पहिल्या कसोटीत पाकिस्तान विजयी   

Subscribe

या विजयासह पाकिस्तानने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

नौमन अली आणि यासिर शाहा या फिरकीपटूंनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर ७ विकेट राखून मात केली. या विजयासह पाकिस्तानने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ३४ वर्षीय डावखुरा फिरकीपटू नौमन अलीने या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि दुसऱ्या डावात ३५ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट घेतल्या. नौमन आणि लेगस्पिनर यासिर शाहा या दोघांनीही दोन डावांत मिळून ७-७ विकेट घेतल्या. पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी ८८ धावांचे आव्हान मिळाले, जे त्यांनी ७ विकेट राखून पूर्ण केले. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुढील गुरुवारपासून रावळपिंडी येथे होणार आहे.

- Advertisement -

फवाद आलमचे शतक 

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २२० धावांत आटोपला आणि याचे उत्तर देताना पाकिस्तानने ३७८ धावांची मजल मारली. त्यांच्याकडून फवाद आलम (१०९) आणि फहीम अश्रफ (६४) यांनी चांगली फलंदाजी केली होती. पहिल्या डावात १५८ धावांनी पिछाडीवर पडलेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात २४५ धावा केल्या. त्यांच्याकडून एडन मार्करम (७४) आणि रॅसी वॅन डर डूसेन (६४) यांनी अर्धशतके केली. तर पाकिस्तानच्या नौमनने ५ आणि यासिरने ४ विकेट घेतल्या.

अझर, बाबरची संयमी फलंदाजी

पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी ८८ धावांचे आव्हान मिळाले, जे त्यांनी ७ विकेट राखून पूर्ण केले. अझर अली (नाबाद ३१) आणि कर्णधार बाबर आझम (३०) यांनी संयमाने फलंदाजी करत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या डावात शतक करणाऱ्या फवाद आलमला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -