घरक्रीडामीराबाई चानूची सुवर्ण कमाई

मीराबाई चानूची सुवर्ण कमाई

Subscribe

कतार आंतरराष्ट्रीय स्पर्धा

माजी विश्व विजेत्या मीराबाई चानूने कतार आंतरराष्ट्रीय करंडक वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. चानूने महिला ४९ किलो वजनी गटात सुवर्ण कामगिरी करताना भारताचे या स्पर्धेतील पदकांचे खातेही उघडले. २५ वर्षीय चानूने १९४ किलो वजन उचलत हे सुवर्णपदक पटकावले. ही स्पर्धा ऑलिम्पिक पात्रतेच्या रौप्य स्तरात मोडते. त्यामुळे या स्पर्धेत मिळवलेले गुण २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तिच्या कामी येतील.

चानूने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असले तरी तिला सर्वोत्तम कामगिरीची नोंद करता आली नाही. तिने यावर्षीच थायलंड येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत २०१ किलो वजन उचलले होते. या कामगिरीसह तिने राष्ट्रीय विक्रमाचीही नोंद केली होती.

- Advertisement -

कतार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिला स्नॅच, तसेच क्लीन आणि जर्कमध्ये केवळ एकदाच वजन योग्यपणे उचलता आले. स्नॅचमध्ये तिने आपल्या दुसर्‍या प्रयत्नात ८३ किलोचे वजन उचलले. मात्र, त्यानंतर अंतिम प्रयत्नात तिला ८७ किलोचे वजन उचलता आले नाही. क्लीन आणि जर्कमध्ये तिने पहिल्याच प्रयत्नात १११ किलोचे उजनी उचलले. मात्र, त्यानंतर ११५ आणि ११६ किलो इतके वजन उचलण्यात तिला अपयश आले. फ्रांसच्या अनैस मिशेल (१७२ किलो) आणि मनॉन लोरेंट्झ (१६५ किलो) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -