घरक्रीडाटी -20 वर्ल्डकपमधून रवींद्र जडेजा बाहेर, खेळणार नाही सामने कारण...

टी -20 वर्ल्डकपमधून रवींद्र जडेजा बाहेर, खेळणार नाही सामने कारण…

Subscribe

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 वर्ल्डकपची तयारी करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. आशिया कप स्पर्धेत दुखापत झाल्याने स्पर्धेतून बाहेर झालेला भारताचा खेळाडू रविंद्र जडेजा वर्ल्डकपमधूनही बाहेर झाला आहे. याबाबत वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

भारतीय संघ सध्या युएईमध्ये आशिया कप २०२२ स्पर्धा खेळत आहे. ग्रुप फेरीत भारतीय संघाने पाकिस्तान आणि हाँगकाँगचा पराभव केला आहे. भारताने सुपर-४ मध्ये प्रवेश केला असून टीम इंडियाची पुढील लढत पाकिस्तानविरुद्ध उद्या ४ सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान गुरुवारी जडेजाला दुखापत झाली असून तो उर्वरित सामन्यात खेळणार नसल्याची बातमी बीसीसीआयने दिली होती. जडेजाच्या जागी संघात अक्षर पटेलला स्थान देण्यात आले आहे.

- Advertisement -

यामुळे खेळणार नाही जडेजा –

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमी नुसार जडेजावर शस्त्रक्रिया केली जाणार असून त्यामुळे तो फक्त आशिया कपमधील उर्वरित सामन्यासाठी नाही तर आगामी टी-२० वर्ल्डकप देखील खेळणार नाही. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या विजेतेपदाच्या दावेदारांमध्ये  भारतीय टीमचा देखील समावेश आहे. जडेजा संघाबाहेर गेल्याने संघाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

- Advertisement -

असा होणार टी- 20 वर्ल्डकप –

टी-२० वर्ल्डकप २०२२टी-२० वर्ल्डकपची सुरूवात १६ ऑक्टोबरपासून होणार असून १३ नोव्हेंबरला फायनल मॅच आहे. स्पर्धेत १६ संघ आहेत. ऑस्ट्रेलियातील ७ शहरात सामने होणार आहेत. भारतला ग्रुप-२ मध्ये ठेवण्यात आले असून या ग्रुपमध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -