घरक्रीडाबंगळुरूत आरसीबीची बल्ले बल्ले, पंजाबला ऐटीत हरवले!

बंगळुरूत आरसीबीची बल्ले बल्ले, पंजाबला ऐटीत हरवले!

Subscribe

टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी आमंत्रण देणं सुरुवातीच्या षटकांमध्ये पंजाबला काहीसं महागात पडलं. विराट कोहली आणि पार्थिव पटेल या दोघांनी अवघ्या ३ ओव्हरमध्ये ३५ धावांची सलामी दिली. पण चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर मोहम्मद शमीनं कॅप्टन कोहलीच्या रुपात मोठी विकेट पंजाबच्या खात्यात टाकली. त्यानंतर आलेल्या एबी डिव्हिलियर्ससोबत पार्थिवनं पंजाबच्या बॉलिंगची पिसं काढायला सुरुवात केली. अवघ्या २४ बॉलमध्ये ४३ धावा वसूल करणाऱ्या पटेलला दोघा अश्विननं माघारी धाडलं. मुरुगन अश्विनच्या बॉलिंगवर आर अश्विननं त्याचा झेल टिपला. त्याच्याच पुढच्या ओव्हरमध्ये आर अश्विननं धोकादायक आणि इन फॉर्म बॅट्समन मोईन अलीला (४) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्याच्याच पुढच्या ओव्हरमध्ये अक्षदीप नाथही(३) विलजोएनच्या बॉलिंगवर मनदीप सिंगकडे झेल देऊन बाद झाला.

टीम अडखळत असताना आलेला स्टॉयनिस आणि त्याच्यासोबत सेट झालेला एबी डिव्हिलियर्स या दोघांनी मग शेवटपर्यंत एकही विकेट न गमावता पंजाबच्या बॉलिंगची अक्षरश: यथेच्छ धुलाई केली. एबीडीनं (४ चौकार, ७ षटकार) अवघ्या ४४ बॉलमध्ये ८२ धावांची खेळी केली. तर मार्कस स्टॉयनिसनं (२ चौकार, ३ षटकार) ३४ बॉलमध्ये ४६ धावांची भर टाकली. या दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरूनं पंजाबसमोर २०३ धावांचं तगडं लक्ष्य ठेवलं.

- Advertisement -

आरसीबीसाठी सर्वात मोठा धोका होता तो म्हणजे ख्रिस गेल. गेलनं फटकेबाजी करत आरसीबीच्या चिंता वाढवल्या देखील होत्या. मात्र, चौथ्या ओव्हरमध्ये उमेश यादवनं १० बॉलमध्ये २३ धावा वसूल करणाऱ्या गेलला माघारी धाडलं आणि कॅप्टन विराट कोहलीनं एकच जल्लोष केला. अर्धी मॅच खिशात घातल्याचाच तो आनंद होता. पण तोपर्यंत गेल त्याचं काम करून गेला होता. टीमचा स्कोअर होता ३.२ ओव्हरमध्ये ४२ रन!

पुढे आलेल्या मयांक अगरवालसोबत राहुलनं आरसीबीच्या बॉलिंगच्या मर्यादा स्पष्ट केल्या. ९व्या ओव्हरमध्येच या दोघांनी पंजाबचं धावांचं शतक धावफलकावर लावलं. दुसऱ्या विकेटसाठी त्यांनी केलेल्या ५९ रनांच्या पार्टनरशिपमध्ये ३५ धावा एकट्या मयांकच्या (२१ बॉल) होत्या! स्टॉयनिसनं मयांकला माघारी धाडल्यानंतर डेव्हिड मिलर आणखी एक आव्हान घेऊन आरसीबीच्या बॉलर्ससमोर उभा राहिला. मागच्या मॅचमध्ये प्रभावी मारा करणारा डेल स्टेन या मॅचमध्ये नसल्यामुळे आरसीबीच्या बॉलिंगच्या मर्यादा स्पष्ट होत होत्या.

- Advertisement -

मात्र अखेरच्या षटकांमध्ये उमेश यादव आणि सैनी यांनी केलेल्या टिच्चून बॉलिंगच्या जोरावर आरसीबीन पंजाबला घरच्या मैदानावर धूळ चारत आयपीएलच्या यंदाच्या सीजनमधला आपला चौथा विजय साजरा केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -