घरक्रीडाIND vs SA : आफ्रिका दौऱ्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका; दुखापतीमुळे रोहित...

IND vs SA : आफ्रिका दौऱ्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका; दुखापतीमुळे रोहित शर्मा कसोटी मालिकेबाहेर

Subscribe

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सर्वच भारतीय खेळाडू सराव करत आहेत. परंतु सरावादरम्यान हिटमॅन रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाली असून ती गंभीर दुखापत असल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. रविवारी मुंबईमध्ये जेव्हा संघ सराव करत होता. त्यावेळी रोहित शर्मा फलंदाजी करत असताना त्याला गंभीर दुखापत झाली आणि दुखापतीच्या कारणास्तव तो भारतीय संघातून बाहेर गेला आहे. सोबतच तो आगामी कसोटी मालिकेला देखील मुकणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती बीसीसीआयने ट्विटच्या माध्यमातून दिली. दरम्यान हिटमॅन शर्माच्या जागेवर भारतीय संघात युवा खेळाडू प्रियांक पांचालला संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार मालिकेतून बाहेर गेल्याने संघात आगामी मालिकेसाठी कोणाकडे उपकर्णधारपद सोपवले जाते ते येत्या काळात स्पष्ट होईल. काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डातर्फे (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. मात्र रोहित शर्माला आफ्रिका दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघाचे टेंशन वाढले आहे. अजिंक्य रहाणेच्या जागेवर रोहित शर्माला उपकर्णधार बनविण्यात आले होते. भारतीय संघ १६ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. मात्र, त्याआधी संघाला तीन ते चार दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाचा पहिला सामना २६ डिसेंबर रोजी सेंचुरियनमध्ये खेळवला जाणार आहे.

- Advertisement -

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका

पहिला सामना – २६-३० डिसेंबर, सेंचुरियन
दुसरा सामना – ३-७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरा सामना – ११-१५ जानेवारी, केपटाउन

- Advertisement -

दक्षिण आफ्रिकेसोबत भारतीय संघाचा पहिला सामना २६ डिसेंबर रोजी सेंचुरियनमध्ये खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना ३ जानेवारी जोहान्सबर्गमध्ये खेळवला जाणार आहे. त्याचप्रकारे तिसऱ्या सामन्याला ११ जानेवारी रोजी केपटाउनमध्ये सुरूवात होणार आहे. असे एकूण तीन सामने दक्षिण आफ्रिकेविरूद्द खेळवण्यात येणार आहेत.


हे ही वाचा : http://Game on 2021 : #OnlyOnTwitter च्‍या माध्‍यमातून क्रीडाप्रेमींना कनेक्‍ट केलेले संवाद; जाणून घ्या कोणता ट्रेंड आहे टॉपवर

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -