घरक्रीडाभारताचा गोलंदाज आर.पी. सिंह निवृत्त

भारताचा गोलंदाज आर.पी. सिंह निवृत्त

Subscribe

भारताचा वेगवान गोलंदाज आर.पी.सिंहने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.  त्याने १४ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि १० टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 

रुद्रप्रताप सिंह ट्विटरवरून क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्याने भारताला २००७ टी-२० विश्वचषक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने २०११ मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळ होता. पण त्यानंतरही तो उत्तर प्रदेश आणि नंतर गुजरात या संघाकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळत होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन 

२००५ मध्ये झिंबाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या आर.पी.सिंहने भारतासाठी चांगले प्रदर्शन केले होते. त्याने १४ कसोटी सामन्यांत ४० विकेट घेतल्या. तर ५८ सामन्यांत ६९ विकेट घेतल्या होत्या. टी-२० च्या १० सामन्यांत त्याने १५ विकेट घेतल्या होत्या.

२००७ टी-२० विश्वचषकात दमदार कामगिरी

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ टी-२० विश्वचषक जिंकला होता. यामध्ये आर.पी.सिंहने चांगले प्रदर्शन केले होते. त्याने या स्पर्धेच्या ६ सामन्यांत १२ विकेट घेतल्या होत्या. या स्पर्धेत द.आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या १३ धावांत ४ विकेट घेतल्या होती.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -