घरक्रीडाISSF World Cup 2022: भारताच्या स्टार नेमबाजपटू सौरभ चौधरीने जिंकले सुवर्णपदक

ISSF World Cup 2022: भारताच्या स्टार नेमबाजपटू सौरभ चौधरीने जिंकले सुवर्णपदक

Subscribe

भारताचा स्टार नेमबाजपटू सौरभ चौधरीने वर्षाच्या सुरूवातीला आणि पहिल्याच आयएसएसएफ विश्वचषकात पुरूषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सौरभ चौधरीने कैरो येथे सुरू असलेल्या विश्वचषक सुवर्णपदकाच्या लढतीत जर्मनीच्या मायकेल श्वॉल्डचा पराभव केला आहे. रशियाच्या आर्टेम चेरनोसोव्हने कांस्यपदक जिंकले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी हल्ल्यामुळे त्याचा ध्वज काढून टाकण्यात आला होता.

- Advertisement -

चौधरी, एक ऑलिम्पियन आणि युवा ऑलिम्पिक सुवर्ण विजेता असून पात्रतामध्ये ५८४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर होते. रिले वनच्या शेवटच्या टप्प्यात त्याने ३८ धावा करून पहिले स्थान पटकावले आहे. त्याचप्रमाणे त्याने ४२.५ गुणांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये भारताच्या ईशा सिंग, श्री निवेता आणि रूचिता विनेरकर यांचा समावेश आहे. या स्पर्धेत ६० देशांतील ५०० हून अधिक नेमबाजांचा सहभाग होणार आहे.

- Advertisement -

श्रेया अग्रवाल उपांत्य फेरीत प्रवेश करू शकली नाही

भारताच्या श्रेया अग्रवालने विश्वचषकाच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या उपांत्य फेरती स्थान गमावलं होतं. श्रेयाने एकूण ६२९.३ चा स्कोर केला होता. आठव्या उपांत्य फेरीतील हंगेरीच्या इज्टोर माझारोसपेक्षा ०.१ ने कमी गुण नोंदवला. कैरो येथे होणारी नेमबाजी विश्वचषक स्पर्धा प्रथमच नवीन नियमांनुसार आयोजित केली जात आहे. नव्याने लागू केलेल्या नवीन नियमांनुसार, १० मीटर एअर रायफल आणि १० मीटर एअर रायफल इव्हेंटमधील एकूण आठ नेमबाज फायनलऐवजी उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.


हेही वाचा : Nawab Malik Arrest: नवाब मलिकांच्या ED च्या अटकेविरोधातील याचिकेवर बुधवारी सुनावणी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -