घरक्रीडासचिन यमगरची महाराष्ट्र केसरीसाठी निवड

सचिन यमगरची महाराष्ट्र केसरीसाठी निवड

Subscribe

महाराष्ट्र केसरी ही मानाची कुस्ती स्पर्धा २ ते ७ जानेवारी या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबई उपनगर जिल्हा तालीम संघाची निवड चाचणी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे कुस्तीपटूंची महाराष्ट्र केसरीसाठी मुंबई उपनगरच्या संघात निवड करण्यात आली आहे. ५५ किलो वजनी गटातील गादीवरील कुस्तीसाठी अभिजित सावंतची निवड झाली असून याच वजनी गटात मातीतील कुस्तीसाठी शुभम मोरेची निवड करण्यात आली. तसेच महाराष्ट्र केसरी गटात सचिन यमगर आणि राजेंद्र राजमाने हे पैलवान खेळतील. तालीम संघाचे अध्यक्ष संपतराव साळुंखे, उपाध्यक्ष दगडू (मामा) पार्टे, किसन मदने, सरचिटणीस विनायकराव गाढवे, खजिनदार सतिश कदम आदींनी निवड चाचणी स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

निवड झालेले पैलवान

५५ किलो : अभिजित सावंत (गादी), शुभम मोरे (माती)
६१ किलो : सौरभ हगवणे (गादी), अभिजित फणसे (माती)
६५ किलो : शुभम ढमाळ (गादी), शुभम हगवणे (माती)
७० किलो : अविष्कार साबळे (गादी), आकाश पवार (माती)
७४ किलो : सुमित मर्गजे (गादी), महेश पवार (माती)
७९ किलो : सुमित डबिरे (गादी), शुभम वरखडे (माती)
८१ किलो : गोविंद दिडवाघ (गादी), राम धायगुडे (माती)
९२ किलो : नाना खांडेकर (गादी), गणेश तांबे (माती)
९७ किलो : अक्षय गरुड (गादी), सतपाल सोनटक्के (माती)

- Advertisement -

महाराष्ट्र केसरी गट :
सचिन यमगर, प्रशिक्षक – नंदकुमार मांढरे, टीम मॅनेजर – दिलीप सरक
राजेंद्र राजमाने, प्रशिक्षक – जगदीश गायकवाड, टीम मॅनेजर – मुकुंद कांचन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -