घरमुंबईअजित पवारांना का वाटतेय ६०२ दालनाची भीती

अजित पवारांना का वाटतेय ६०२ दालनाची भीती

Subscribe

अजित पवार…महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातील एक महत्त्वाचे नाव. कुणालाही न घाबरता रुबाबत राहणारे अशी अजित दादांची ओळख. पण तुम्हाला माहिती आहे का अजित ‘दादां’नी सध्या मंत्रालयातील ६०२ क्रमांकाच्या दालनाचा चांगलाच धसका घेतला आहे. अजित पवार यांनी नुसता धसका घेतला नाही तर चक्क या दालनाचा ताबा घेण्यासच नकार दिला. या दालनाचा पूर्वइतिहास पाहता अजितदादांनी ते कार्यालय ताब्यात घेण्यास नकार दिला असून, त्याऐवजी त्यांनी सहाव्या मजल्यावरील सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या कार्यालयावर कब्जा केला आहे. या कार्यालयाची डागडूजी केल्यानंतर अजित पवार ताबा या दालनाचा ताबा घेणार आहेत. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सत्तेचे केंद्र आहे. कारण सहाव्या मजल्यावरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची दालने आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्र्याच्या दालनानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या दालन हे सर्वात मोठे दालन आहे. त्यामुळेच अजित दादांना ६०२ क्रमांकाचे दालन देण्यात आले. मात्र त्यांनी त्याचा ताबाच घेतला नाही.

का नकोय 602 क्रमांकाचे दालन
आतापर्यंत ६०२ क्रमांकाच्या दालनात ज्या-ज्या मंत्र्याने कारभार केला, त्यांना राजकारणात प्रगती करता आली नसल्याची चर्चा आहे. १९९९ मध्ये राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. नियमानुसार ६०१ क्रमांकाचे दालन मुख्यमंत्री तर ६०२ क्रमांकाचे दालन उपमुख्यमंत्री यांना देण्याचा प्रघात आहे. त्यानुसार छगन भुजबळ यांनी त्या दालनाचा स्वीकार केला. कालांतराने भुजबळांवर तेलगी घोटाळ्याचा आरोप झाला आणि त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. त्यानंतर हेच दालन राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाले.

- Advertisement -

अजितदादांनी याच दालनातून कारभार पाहिला. पण, सिंचन घोटाळ्यामुळे त्यांच्यावर आरोप झाले. त्यामुळे त्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता.२०१४ मध्ये आघाडी सरकारचा पराभव करीत भाजपने सत्ता काबीज केली. त्यावेळी ६०२ दालन हे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मिळाले. एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल विभागासह अनेक खात्यांचा पदभार होता. परंतु, एमआयडीसी जमीन घोटाळ्यामुळे खडसे यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर ६०२ दालन भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांना देण्यात आले होते. फुंडकर हे तत्कालीन कृषीमंत्री होते. दुर्दैवाने फुंडकर यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या रिक्त जागी भाजपचे आमदार अनिल बोंडे यांची कृषीमंत्री म्हणून वर्णी लावत त्यांनाही तेच दालन दिले. पण, विधानसभा निवडणुकीत अनिल बोंडे यांचा पराभव झाल्याने त्यांना घरी बसावे लागले आहे.

मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि उपमुख्यमंत्री असे सगळे सहाव्या मजल्यावर बसतात. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये मुख्य सचिवांचे दालन असणार आहे. त्यामुळे कात्रित पकडून कामे करून घेता येतील.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -