घरक्रीडासायना नेहवालला जेतेपद

सायना नेहवालला जेतेपद

Subscribe

अंतिम सामन्यात मरीनची दुखापतीमुळे माघार

स्पेनची स्टार बॅडमिंटनपटू कॅरोलिना मरीनला दुखापतीमुळे अंतिम सामन्यात अर्ध्यातूनच माघार घ्यावी लागल्याने भारताच्या सायना नेहवालने इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावले. हे तिचे मागील दोन वर्षांतील पहिले बीडब्लूएफ जेतेपद होते. लंडन ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणारी सायना अंतिम सामन्याच्या पहिल्या गेममध्ये ४-१० अशी पिछाडीवर असताना मरीनचा गुडघा दुखावल्यामुळे तिने या सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सायनाने २०१७ नंतरचे पहिले बीडब्लूएफ जेतेपद पटकावले. तिने २०१७ मध्ये मलेशियामध्ये स्पर्धा जिंकली होती.

या सामन्यानंतर सायना म्हणाली, हे वर्ष सर्वच खेळाडूंसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे मरीनला दुखापत झालेली पाहून फार वाईट वाटले. मी स्वतः मागील काही काळ विविध दुखापतींचा सामना करते आहे. एखाद्या खेळाडूला कोर्टवर दुखापत झालेली पाहणे हे फारच वेदनादायी असते. हा अंतिम सामना मी जिंकले याचा मला फारसा आनंद झालेला नाही. पण, मी बिंग जिओचा उपांत्य फेरीत पराभव करत ही अंतिम फेरी गाठली होती याचा आनंद आहे. अंतिम सामन्यात कॅरोलिनाचे पारडे जड मानले जात होते. त्यामुळे मला या सामन्यात चांगली झुंज द्यायची होती. पण, तसे करण्याची संधी मिळाली नाही.

- Advertisement -

या सामन्याआधी मरीन आणि सायना यांच्यात एकूण ११ सामने झाले होते. त्यापैकी ६ सामने मरीनने तर ५ सामने सायनाने जिंकले होते. तसेच, मागील आठवड्यातच मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मरीनने सायनाचा पराभव केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -