Eco friendly bappa Competition
घर क्रीडा 'या' आहेत फिफा ट्राफीच्या खास गोष्टी

‘या’ आहेत फिफा ट्राफीच्या खास गोष्टी

Subscribe

ब्राझीलने तीन वेळा ट्रॉफी जिंकत १९७० साली ट्रॉफीचे मालक बनले. मात्र १९८३ ला रियो डी जनेरियो येथे ट्रॉफी चोरीला गेली.

जगभरातील फुटबॉलप्रेंमीसाठी उत्सवासारखा असणारा फिफाचा २१वा विश्वचषक रशियात दिमाखात सुरू झाला आहे. फिफाची ट्रॉफी ही फुटबॉलच्या जगातातील सर्वात मोठा मानाचा पुरस्कार मानली जाते. ट्रॉफी मिळवण्यासाठी ३२ देश महिनाभर झुंजणार आहेत. या स्पर्धेत जगातील नामंवत खेळाडू आपआपल्या देशाला हा मान मिळवून देण्यासाठी धडपडणार आहेत. जाणून घेऊया नेमका काय आहे हा फिफा ट्रॉफीचा इतिहास 

पहिल्या फिफा विश्वचषक ट्रॉफीचा इतिहास

सध्याची ट्रॉफी ही फिफा पुरस्काराचं नवीन रुप आहे. पूर्वी देण्यात येणारी ट्रॉफी ही १९४६ दरम्यान फिफा विश्वचषक स्पर्धेचे संस्थापक जुलस रिमेट यांच्या नावे ‘ज्युलस रिमेट चषक’ या नावाने दिली जात होती. जी ट्रॉफी फिफाने फ्रेंच शिल्पकार हाबेल लॅफ्ल्यूर यांच्याकडून बनवून घेतली होती. या ट्रॉफीची प्रतिकृती ही एक अष्टकोनी भांडे धारण करणाऱ्या देवीच्या आकाराची असून त्याला सोन्याचा पायादेखील होता. या ट्रॉफीचा इतिहासदेखील मोठा आहे. १९६६ साली ही ट्रॉफी इंग्लंडमध्ये एका प्रदर्शनात ठेवली असताना चोरीला गेली होती. पिकल्स नावाच्या एका कुत्र्याच्या मदतीने ट्रॉफी परत मिळवण्यात यश आले.

- Advertisement -

old fifa trophy
फिफाची जुनी ट्रॉफी (सौजन्य- पिनट्रेस्ट)

जेव्हा फिफाचा कप चोरीला जातो

फिफाच्या नियमात म्हटले गेले होतेकी तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकणारा कोणताही देशाचे ट्रॉफीवर पूर्ण मालकत्व असेल. ब्राझीलने तीन वेळा ट्रॉफी जिंकत १९७० साली ट्रॉफी कायमची आपल्या नावे केली. मात्र १९८३ ला रियो डी जनेरियो येथून ट्रॉफी चोरीला गेली. यांनतर ही ट्रॉफी परत कधीच दिसली नाही. यामुळे फिफा विश्वचषक समितीने १९७४ मध्ये दहाव्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी एक नवीन ट्रॉफी तयार केली. नवीन आलेल्या नियमानुसार मूळ फिफा विश्वचषकाची ट्रॉफी आता कोणत्याही संघाला दिली जात नाही, ती फिफाच्याच ताब्यात राहते. त्याऐवजी,फिफाची संघटना फिफा विश्वचषक विजेत्यांना ट्रॉफीची एक प्रतिकृती देऊन सन्मानित करते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -