Sri Lanka : क्रिकेटपटूंसाठी निवृत्तीचा मार्ग कठीण होणार, बोर्डाला तीन महिने आधीच द्यावी लागणार नोटीस

श्रीलंका क्रिकेटमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. नुकतचं भानुका राजपक्षेने वयाच्या ३० व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं होतं. तसेच सलामीवीर दानुष्का गुणातिलकनेही कसोटी क्रिकेट सोडण्याची घोषणा केली होती. या खेळाडूंनी क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर श्रीलंका क्रिकेटवर एक प्रकारे संकट ओढावल्याचं चिन्हं दिसत आहे.

क्रिकेटपटूंबाबत तीन कठोर निर्णय

श्रीलंका क्रिकेटने निवृत्ती घेतलेल्या किंवा भविष्यात निवृत्ती घेणार्‍या क्रिकेटपटूंबाबत तीन कठोर निर्णय घेतले आहेत. सर्वात पहिलं म्हणजे जे राष्ट्रीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांना तीन महिन्यांपूर्वीच श्रीलंका क्रिकेट बोर्डाला नोटीस द्यावी लागणार आहे.

दुसरं म्हणजे खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यानंतर त्यांना विदेशी फ्रेंचायझी लीगमध्ये खेळण्यासाठी एनओसी जारी केले जाणार आहेत. तिसरं म्हणजे सेवानिवृत्ती राष्ट्रीय खेळाडूंना एलपीएलसारख्या स्थानिक लीगसाठी पात्र मानले जाईल. जर लीग आयोजित करण्यापूर्वी त्याने देशांतर्गत ८० टक्के सामने खेळले असतील. तरच त्याला लीगसाठी पात्र मानले जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेण्याची घोषणा

भानुका राजपक्षेने अत्यंत कमी वेळेत आपल्या निवृत्तीची नोटीस श्रीलंका क्रिकेट बोर्डाला सादर केली होती. ५ जानेवारी २०२२ रोजी ३० वर्षाच्या वयातच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेण्याची घोषणा केली होती. राजपक्षे अंडर-१९ वर्ल्डकप २०१० मध्ये श्रीलंकेसाठी सर्वात जास्त धावा पटकावणारा खेळाडू आहे. परंतु त्याला पहिल्यांदा जवळपास दहा वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय डेब्यूसाठी वाच पहावी लागली. तर ऑक्टोबर २०१९ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय डेब्यू जुलै २०२१ मध्ये एकदिवसीय मालिकेमध्ये डेब्यू केलं होतं.


हेही वाचा : गुजरात किनाऱ्यावर भारतीय तटरक्षक दलाने पकडली पाकिस्तानी बोट, १० संशयितांना अटक