एक वर्षानंतरही राज्याला मिळेना पूर्णवेळ पोलीस महासंचालक, संजय पांडे आजही प्रभारी

१ जानेवारी २०२१ पासून ९ एप्रिल २०२१ पर्यंत हेमंत नगराळे प्रभारी पोलीस महासंचालक होते. नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नेमणूक झाल्यानंतर १० एप्रिल २०२१ पासून मागील ९ महिने संजय पांडे हे प्रभारी पोलीस महासंचालक आहेत.

after one year maharashtra did not get full time director general of police
एक वर्षानंतरही राज्याला मिळेना पूर्णवेळ पोलीस महासंचालक, संजय पांडे आजही प्रभारी

महाराष्ट्रसारख्या राज्याच्या पोलीस महासंचालकाचे पद हे मागील १ वर्षापासून रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाने दिली आहे. मागील १ वर्षापासून पूर्णकालिक महासंचालकाची नेमणूक न झाल्याने सद्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पांडे यांना अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पोलीस महासंचालक कार्यालयाकडे महासंचालकाचे रिक्त पदाबाबत माहिती मागितली होती. पोलीस महासंचालकाचे वरिष्ठ कार्यासन अधिकारी श्रीकांत पाटील यांनी अनिल गलगली यांना कळविले की, ‘पोलीस महासंचालक हे पद १ जानेवारी २०२१ पासून रिक्त आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पांडे यांना १० एप्रिल २०२१ अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. पोलीस महासंचालक पदासाठी सेवाज्येष्ठतेची यादी तसेच प्रस्तावाची माहिती त्यांच्या महासंचालक कार्यालयात संबंधित नसल्याचे सांगितले. अनिल गलगली यांचा अर्ज गृह विभागाकडे हस्तांतरित केला.’

अनिल गलगली यांनी याबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांना पत्र पाठवून मागणी केली आहे की, ‘महासंचालक पद हे महत्वाचे असून तत्काळ नेमणूक होणे गरजेचे आहे. अशा पदाचा कार्यभार दिले जाणे हे महाराष्ट्र सारख्या प्रगतशील राज्यासाठी भूषणावह नाही.’

दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२१ पासून ९ एप्रिल २०२१ पर्यंत हेमंत नगराळे प्रभारी पोलीस महासंचालक होते. नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नेमणूक झाल्यानंतर १० एप्रिल २०२१ पासून मागील ९ महिने संजय पांडे हे प्रभारी पोलीस महासंचालक आहेत. संजय पांडे यांना प्रभारी पोलीस संचालक म्हणून ९ महिने पूर्ण झाले असून ते ३० जून २०२२ अखेर निवृत्त होणार आहेत.


हेही वाचा – गोव्याच्या निवडणुकीत तृणमूल, आपच्या पैशांचे धनी कोण? संजय राऊतांचा सवाल