घरक्रीडामहावीरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

महावीरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

Subscribe

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा

महाराष्ट्र शासनाच्या इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे महाराष्ट्र स्टेट ई-२ झोनल स्पर्धा नुकत्याच नाशिकमध्ये पार पडल्या. या स्पर्धेच्या वेटलिफ्टिंगमधील ६६-६९ किलो गटात श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या महावीर पॉलीटेक्निकचा विद्यार्थी विशाल जाधवने प्रथम क्रमांक पटकावला, तर ७७-८५ किलो गटात महावीर पॉलीटेक्निकच्याच अनिकेत येवलेने दुसरा क्रमांक मिळवला. त्यांना प्रशस्तीपत्रक आणि चषक देऊन गौरवण्यात आले.

विशाल जाधव आणि अनिकेत येवले यांना क्रीडा समन्वयक प्रा. संतोष वाबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांनी या स्पर्धेत केलेल्या दमदार कामगिरीबद्दल श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापकीय विश्वस्थ राहुल संघवी, सोसायटीच्या समन्वयक तथा डीन डॉ. प्रियंका झवर, महावीर पॉलीटेक्निकचे प्राचार्य संभाजी सगरे, प्रा. संतोष वाबळे, जगदीश कोल्हे, प्रा. पूजा भालेराव, प्रा. वर्षा गाढे, प्रा. नंदिनी खुटाडे, तसेच महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -