घरक्रीडाम्हणून रोहित हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळला - सुनिल गावसकर

म्हणून रोहित हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळला – सुनिल गावसकर

Subscribe

भारताचा उपकर्णधार रोहित शर्माला आगामी ऑस्ट्रलिया दौऱ्यातून वगळल्याने जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक माजी क्रिकेटपटू बीसीसीआयच्या निवड समितीवर टीका करत आहेत. रोहित आयपीएलमध्ये खेळतोय मग त्याला संघात का नाही घेतले? असा सवाल केला जात आहे. सुनिल गावसकर यांनी सुरुतीपासून रोहित शर्माला वगळण्यावरुन धारेवर धरले आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा ते रोहित शर्माला पाठिंबा दर्शवला आहे. बीसीसीआयला दाखवून देण्यासाठीच रोहित आयपीएलमध्ये हैदराबादविरुद्धचा सामना खेळला, असे सुनिल गावसकर म्हणाले.

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रोहित मैदानावर उतरला. तीन सामन्यांनंतर पुन्हा एकदा मैदानावर येत मी पूर्ण फिट आहे, असे दाखवून दिले. यावर सुनिल गावसकर यांनी रोहितला पाठिंबा देत BCCI ला मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे हे दाखवण्यासाठीच रोहित हैदराबाद विरुद्धचा सामना खेळला, असे म्हणाले.

- Advertisement -

एका वेबसाईटशी बोलताना गावसकरांनी रोहितला पाठिंबा देताना बीसीसीआयवर निशाणा साधला. “आतापर्यंत रोहितच्या फिटनेसवरुन जे काही घडले ते आता बाजूला ठेवून रोहितला संघात घ्यावे. रोहित शर्मा फिट आहे हे भारतीय क्रिकेटसाठी चांगली गोष्ट आहे. घाई केली तर रोहित पुन्हा दुखापतग्रस्त होईल, असे काहींनी म्हटले. ते बरोबर आहे. पण रोहित मैदानावर पूर्णपणे आत्मविश्वासाने खेळताना दिसला. त्याने सीमारेषेवरवर आणि सर्कलच्या आतही क्षेत्ररक्षण केले,” असे सुनिल गावसकर म्हणाले.


हेही वाचा – रोहित शर्माची सीबीआय चौकशी करा; BCCI वरही गंभीर आरोप

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -