घरक्रीडातामिळनाडूचा शाम अजिंक्य

तामिळनाडूचा शाम अजिंक्य

Subscribe

महापौर बुध्दिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या शाम आरचे यश

मुंबई महापौर चषक एल.आय.सी.पुरस्कृत फिडे खुल्या बुध्दिबळ स्पर्धा मुंबईत पार पडली. या स्पर्धेतील ‘क’ गट बुध्दिबळ स्पर्धेचे विजेतेपद बाराव्या मानांकित तामिळनाडूच्या शाम आर. याने पटकाविले. साखळीत शेवटच्या दहाव्या फेरीत पहिल्या पटावर अपराजित शाम आर.याने तामिळनाडूच्याच सतीश कुमार विरुद्धच्या लढतीत विजयाची संधी असतानाही बरोबरीचा डाव मान्य केला. सर्वाधिक ९.५ गुणांची कमाई करीत शामने महापौर चषक आणि रु. १,५१,०००/- चा पुरस्कार जिंकला. स्पर्धेतील द्वितीय क्रमांक श्रीलंकेच्या सिवाथानुजनने (८.५ गुण), तर तृतीय क्रमांक तामिळनाडूच्या सतीशकुमारने (८. ५ गुण) यांनी मिळविला.

व्हीनस चेस अकॅडमीतर्फे मुंबई उपनगर जिल्हा बुध्दिबळ संघटना आयोजित क गट बुध्दिबळ स्पर्ध्येच्या निर्णायक दहाव्या फेरीमधील तिसऱ्या पटावर महाराष्ट्राच्या प्रिन्स जयस्वालने श्रीलंकेच्या सिवाथानुजनच्या १३ व्या चालीतील चुकीचा लाभ उठवून डावावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. परंतु ३२ व्या चालीनंतर बाजी उलटविण्यात सिवाथानुजनला यश लाभले आणि ५२ व्या चालीला सिवाथानुजनने प्रतिस्पर्ध्याच्या राजावर मात करून द्वितीय स्थानावर झेप घेतली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अखिल भारतीय बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी भरत सिंग चौहान, मुंबई उपनगर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी विठ्ठल माधव व संयोजक रवींद्र डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -