घरक्रीडामहेंद्रसिंग धोनीशी निवडकर्त्यांनी भविष्याबाबत चर्चा करावी - गंभीर

महेंद्रसिंग धोनीशी निवडकर्त्यांनी भविष्याबाबत चर्चा करावी – गंभीर

Subscribe

महेंद्रसिंग धोनीशी त्याच्या भविष्याबाबत निवड समितीने चर्चा केली पाहिजे, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. जुलैमध्ये इंग्लंड येथे झालेल्या आयसीसी विश्वचषकानंतर धोनी भारतासाठी खेळलेला नाही. त्याने अजून निवृत्तीही घेतलेली नाही. मात्र, त्याची वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड झाली नव्हती. परंतु, भारतासाठी खेळताना तुम्ही सातत्याने सामने खेळले पाहिजे, असे गंभीरला वाटते.

निवृत्ती घ्यायची की नाही, हा प्रत्येक खेळाडूचा वैयक्तिक निर्णय आहे. धोनीशी निवड समितीने चर्चा केली पाहिजे आणि त्याच्या भविष्याच्या योजनांबाबत जाणून घेतले पाहिजे. माझ्या मते, भारतासाठी खेळताना तुम्ही कोणत्या मालिकेत खेळणार आणि कोणत्या मालिकेत खेळणार नाही, हे स्वतः ठरवू शकत नाही. तुम्ही सातत्याने खेळत राहिले पाहिजे, असे गंभीर म्हणाला.

- Advertisement -

भारताचा कर्णधार विराट कोहलीला, धोनी आणि रोहित शर्मा संघात असल्याचा फायदा होतो, असे याआधी गंभीर म्हणाला होता. याबाबत त्याला विचारले असता त्याने सांगितले, मागील विश्वचषकात कोहलीने कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी केली. मात्र, त्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. त्याला कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप यश मिळाले आहे, कारण त्याच्यासोबत रोहित शर्मा आहे आणि धोनी बराच काळ सोबत होता.

तुम्ही किती चांगले कर्णधार आहेत, हे खरे फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये कळते. तिथे तुम्हाला मदत करायला इतर खेळाडू नसतात. रोहित आणि धोनीला मी चांगले कर्णधार मानतो, कारण त्यांनी आयपीएलमध्ये खूप यश मिळवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -