घरफिचर्सबांधावरले दादा ! वेटिंग लिस्टमध्ये

बांधावरले दादा ! वेटिंग लिस्टमध्ये

Subscribe

बांधावरले दादा…पंचक्रोशीतले गाजलेले तबलजी…आपल्या हयातीत त्येंनी कित्येक डबलबारी गाजवल्यानी होते… भल्याभल्यांची दादांनी वाजवल्यानी होती…समोरचो केवढो तो मोठो असांदे, दादांनी वाजवूक सुरु केल्यानी की भजन रंगाकच होया…खालच्यावाडीच्या वाघांच्या भजन मंडळात ते सुरुवातीपासून होते. कोरसपासून, टाळ वाजवणारे ते अगदी तबलजीपर्यंतचो प्रवास दादांचो याच भजन मंडळात झालो. पण दादांका पेटयेवर बसाची महत्वकांक्षा. मग काय, वाघ बुवांनी दादांका मंडळाच्या बाहेर काढल्यानी किंवा दादा पण वैतागान बाहेर पडले. मग त्येंनी पैलाडच्या वाडीतल्या भजन मंडळात उडी मारल्यानी…तेंका पहिल्यांदा थय फक्त झंज वाजूक बसवल्यानी. आपली गाडी हेच्या पुढे काय सरकत नाय म्हटल्यावर दादांनी त्या पण भजन मंडळाक ’हात’दाखवल्यानी. पण शेवटी दादाच ते. आणि “स्वाभिमान”त्येंच्या नसानसात पहिल्यापासून भिनलेलो…दादांनी आपला स्वतःचा भजन मंडळ स्थापन केल्यानी.आता दादांका खरो चान्स मिळालो. दादा मोठ्या रुबाबात पेटयेवर बसले. आपल्या झिलाक त्येनी मृदूंगाचो ताबो दिल्यानी…दादांचो बारको झील पैलाडकरांच्या भजनात जबरदस्तीन आपलो गाणी म्हणत होतो…शेवटी त्येचा मन ह्या दादांच्या मंडळातच होता… थोडो धीर धर म्हणत दादांनी त्येका कसोबसो थोपवून धरल्यानी होतो…वर्षभर दादांनी भजना केल्यानी पण खय यश पदरात पडत नव्हता. दादांचो तबलजी मोठो झील पण फक्त जोरात वाजवूचा कामं करत होतो.. पण त्येका पण नाय ताळ होतो.. नाय मेळ. धरकारी म्हणजे कोरस पण चालू भजनात दुसर्‍या मंडळात जावन बसाक लागले…तेव्हा दादांका कळान चुकला. नुसती पेटी हातात इली म्हणजे झाला नाय… डबलबारी जिंकाची पण लागता. दादांचो स्वाभिमान पण आता निवाळलो होतो. फुल्ल फॉर्मत असलेल्या वरच्या वाडीतल्या कमला भजन मंडळात गेल्याशिवाय आता पर्याय नाय ह्या दादांका समाजला…कमला भजन मंडळान गेल्या 6 वर्षात अनेक डबलबारी जिंकल्यान होते…तुमच्या पेटयेत आणि मृदूंगात काय तरी घोळ आसा असो आरोप या भजन मंडळावर समोरच्या बुवांनी केल्यानी पण काय फरक पडलो नाय..उलट पवार वाडीतल्या भजन मंडळातले अनेक कोरस घेऊन वरच्या वाडकरानी आपला मंडळ मजबूत केल्यानी. म्हणून एकंदरीत आपला भवितव्य बघून दादांका कमला भजन मंडळात जावचा आसा. पण दादांका जुना म्हणजेच खालच्या वाडीतल्या वाघ बुवांचा मंडळ आडकाठी घालता हा. खालच्या आणि वरच्या वाडीतल्या मंडळांक एकत्र येऊन मुंबईतल्या मंत्रालयातली डबलबारी स्पर्धा जिंकाची आसा. पण दादांका घेतलास तर आम्ही येवंचव नाय असो “बाण”खालच्या मंडळान मारल्यान आसा. आणि तोच बाण दादांच्या जिव्हारी लागलो आसा. नदीकाठच्या घरात आता दादांचा मन रमत नाय.. बांधावर जावन ते वरच्या वाडीकडे तोंड करून आशेवर असतत. पितृपक्षातली भजना दादांनी कशे तरी दोन चार कोरस जमा करून केल्यानी. पण त्यांचा लक्ष्य मुंबईतली डबलबारी स्पर्धा आसा.वरच्या, खालच्या मंडळांची घटस्थापनेपर्यंत कुरबुर सुरु रवण्याची शक्यता आसा. तोपर्यंत तरी “माका घेतले, माका घेतले” एवढाच म्हणना दादांच्या हातात आसा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -