घरमहाराष्ट्रपंचायत समितीच्या मुख्यालयाला गळती

पंचायत समितीच्या मुख्यालयाला गळती

Subscribe

आठ वर्षांपूर्वी तब्बल तीन कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या विक्रमगड पंचायत समितीच्या मुख्य इमारतीलाच गळती लागली आहे. अधिकारी, कर्मचारी, पदाधिकार्‍यांच्या खोल्यांमध्ये पाणी ठिबकत असल्याने सगळ्यांचीच गैरसोय होऊ लागली आहे.

विक्रमगड पंचायत समितीसाठी नवी प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी 2 कोटी 98 लाख रुपये खर्च करण्यात आले. 7 ऑगस्ट 2011 रोजी तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आणि पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर या इमारतीत सर्व कारभार सुरु झाला. मात्र, अवघ्या आठ वर्षातच इमारतीला गळती लागली आहे.

- Advertisement -

इमारतीत प्रशासकीय विभाग,सभापती चेंबर, गट विकास अधिकारी चेंबर,आरोग्य विभाग,सामान्य विभाग,ज्ञापण आदी विभाग कार्यरत आहेत. त्याठिकाणी अनेक अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी काम करतात. तसेच दररोज शेकडो लोकांची ये-जा असते. पण, यासर्व विभागाच्या छताला गळती लागली आहे. दालनात पाणी येत असल्याने बसणे मुश्किल झाले आहे. तसेच कागदपत्रे भिजून नुकसान होण्याची भितीही निर्माण झाली आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.

अवघ्या आठ वर्षात इमारत गळू लागल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप केला जात आहे. याकामाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दुसरीकडे, इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. आता आचारसंहिता लागू झाल्याने प्रस्तावाला मंजूरी मिळेल नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे, पाऊस थांबायला तयार नसल्याने गळक्या इमारतीत काम करण्याशिवाय कर्मचार्‍यांना दुसरा पर्याय राहिलेला नाही.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -