घरक्रीडापार्ले महोत्सवाची दिमाखात सुरुवात

पार्ले महोत्सवाची दिमाखात सुरुवात

Subscribe

 विश्वविजेत्या दिव्यांग क्रिकेट संघाचा कर्णधार विक्रांत केणीच्या हस्ते उदघाटन

मुंबईतील लोकप्रिय पार्ले महोत्सवाची दिमाखात सुरुवात झाली. २० व्या पार्ले महोत्सवाचे उदघाटन विश्वविजेत्या दिव्यांग भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विक्रांत केणीच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटन सोहळ्याला प्रमुख आयोजक आमदार पराग अळवणी, दिव्यांग भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी, संचालक विनोद देशपांडे, नगरसेविका ज्योती अळवणी आणि सुनीता मेहता, नगरसेवक अभिजित सामंत आणि अनिष मकवानी आदी मान्यवर उपस्थित होते.

यंदा महोत्सवातील क्रीडा स्पर्धा वामन मंगेश दुभाषी मैदान परिसरात होणार असून याला स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडा नगरी असे, तर कला आणि सांस्कृतिक स्पर्धा साठ्ये महाविद्यालय परिसरात संपन्न होणार असून याला प्रा. मोहनराव आपटे कला दालन असे नाव देण्यात आले आहे.

- Advertisement -

या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी धावणे आणि सायकलिंगच्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांत २००० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. रविवारी शालेय आणि खुल्या कबड्डी स्पर्धेत १००० स्पर्धक, तर पार्ल्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांसाठीच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत ३०० स्पर्धक सहभागी झाले.

जिद्द असल्यास कोणत्याही अडथळ्यांवरमात करु शकता – सुलक्षण कुलकर्णी

इंग्लंडमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या दिव्यांग विश्वचषकाचे भारताने जेतेपद पटकावले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य देशांच्या खेळाडूंमध्ये केवळ १५ टक्के, तर भारतीय खेळाडूंमध्ये ४० टक्के दिव्यंगत्व असतानाही आपण विश्वचषक जिंकण्याची उल्लेखनीय कामगिरी केली, असे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी सांगितले. तुमच्यात जिद्द असल्यास तुम्ही कोणत्याही अडथळ्यांवर मात करु शकता, ही शिकवण मला या संघाचे प्रशिक्षकपद भूषवल्यानंतर मिळाली, असेही कुलकर्णी यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -