घरक्राइमUlhasnagar shootout : गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Ulhasnagar shootout : गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Subscribe

ठाणे : कल्याण लोकसभा क्षेत्रातील उल्हासनगर हिललाइन पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री उशीरा केलेल्‍या गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपीटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. (Ulhasnagar shootout Ganpat Gaikwad remanded in police custody till February 14)

हेही वाचा – Chhagan Bhujbal : ओबीसींच्या पहिल्या सभेआधीच मंत्रिमंडळचा राजीनामा दिला; भुजबळांचा गौप्यस्फोट

- Advertisement -

आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पोलिसांनी दोघांना अटक करून गुन्हा दखल केला. शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आरोपींना उल्हासनगर चोपडा न्यायालयात सादर करण्याची विनंती गणपत गायकवाड यांच्या वकिलांनी केली होती. मात्र न्यायालयाने  त्यांची मागणी फेटाळत आरोपींना प्रत्यक्ष हजर करा, असे आदेश दिले. यामुळे आमदार गणपत गायकवाड, हर्षल केने आणि संदीप सरवणकर या तिन्ही आरोपींना कळवा पोलीस स्टेशन येथून पोलीस बंदोबस्तात शनिवारी सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी उल्हासनगर चोपडा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिघांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 307 आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तिन्ही आरोपींना कळवा पोलीस ठाण्यात आले असून पुढील तपास ठाणे क्राईम ब्रांच करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी न्यायालयात काय सांगितले?

न्यायालयात गुन्ह्याची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, गणपत गायकवाड यांनेच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे. त्याची बंदूक जप्त करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणी काही आरोपी फरार आहे आणि त्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच गणपत गायकवाड यांच्या आवाजाचे नमूने घ्यायचे आहेत. याशिवाय गणपत गायकवाड यांच्यावर यापूर्वी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गायकवाड आणि इतर आरोपींची 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी ही कोठडी हवी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयासमोर केली.

- Advertisement -

हेही वाचा – Jarange Vs Bhujbal : तुझं वय झालं आहे, गप्प बस नाही तर टपकन…; जरांगेंकडून पुन्हा एकेरी उल्लेख

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव हा महिनाभरापासून सुरू असलेल्या जमिनीच्या प्रकरणात तक्रार देण्यासाठी शुक्रवारी आपल्या कार्यकर्त्यांसह उल्हासनगरमधील हिल लाइन पोलीस ठाण्यात आला होता. त्याचवेळी महेश, पाटील व चैनू जाधव हे देखील आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर गणपत गायकवाड हे देखील आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात आले. यावेळी हिल लाइन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाच्या दालनात गणपत गायकवाड यांनी रात्री उशीरा महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -