घरक्रीडाIND vs AUS : वर्णभेदी टीका झाल्यावर पंचांनी आम्हाला 'हा' पर्याय दिला -...

IND vs AUS : वर्णभेदी टीका झाल्यावर पंचांनी आम्हाला ‘हा’ पर्याय दिला – सिराज 

Subscribe

काही चाहत्यांनी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यावर वर्णभेदी टीका केली होती.

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियन दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघाने उत्कृष्ट खेळ केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकला. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झाला. या सामन्यादरम्यान काही चाहत्यांनी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर वर्णभेदी टीका केली होती. भारतीय संघ व्यवस्थापनाने आणि बीसीसीआयने याबाबतची तक्रार ही सामनाधिकारी डेविड बून यांच्याकडे केली होती. मात्र, सलग दोन दिवस खेळाडूंवर वर्णभेदी टीका झाल्यानंतर पंच पॉल रायफल आणि पॉल विल्सन यांनी भारताला सामन्यातून माघार घेण्याचा पर्याय दिला होता. मात्र, कर्णधार रहाणेने तो नाकारला, असे सिराजने गुरुवारी सांगितले.

आम्ही चूक केली नव्हती

ऑस्ट्रेलियात चाहत्यांनी मला बरेचदा शिवीगाळ केली. आमच्यावर वर्णभेदी टीका झाली. याबाबतचा खटला अजून सुरु असून याचा निकाल काय लागतो हे पाहणे महत्वाचे ठरले. मला न्याय मिळेल अशी आशा आहे. पंचांनी आम्हाला सिडनी कसोटीतून माघार घेण्याचा पर्याय दिला होता. परंतु, रहाणेने सामना अर्ध्यात सोडण्यास नकार दिला. आम्ही कोणतीही चूक केली नव्हती. त्यामुळे आम्हाला सामना खेळत राहण्याचा निर्णय घेतला, असे सिराज म्हणाला.

- Advertisement -

खेळावर परिणाम नाही

ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी शिवीगाळ केल्याने माझ्यातील जिद्द आणखी वाढली. मी मानसिकदृष्ट्या अधिक कणखर झालो. त्यांच्या चिडवण्याचा माझ्या खेळावर अजिबातच परिणाम झाला नाही, असेही सिराजने सांगितले. सिराजने या मालिकेदरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि या मालिकेत त्याने भारताकडून सर्वाधिक १३ विकेट घेतल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -