घरक्रीडापावसाने केला घात!

पावसाने केला घात!

Subscribe

मुंबईचे आव्हान संपुष्टात,विजय हजारे करंडक स्पर्धा

पावसाच्या व्यत्ययामुळे मुंबई आणि छत्तीसगड यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना अर्ध्यातच थांबवावा लागला. या सामन्यात ३९ षटकांत १९५ धावांचा पाठलाग करताना मुंबईची ११.३ षटकांनंतर बिनबाद ९५ अशी धावसंख्या होती. मात्र, यानंतर पावसाला सुरुवात झाली. मुंबईच्या डावात २० षटके होऊ न शकल्याने हा सामना रद्द करावा लागला. मुंबईपेक्षा जास्त साखळी सामने जिंकल्याने छत्तीसगडने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. अ गटात छत्तीसगडने पाच, तर मुंबईने चार साखळी सामने जिंकले होते. त्यामुळे गतविजेत्या मुंबईचे आव्हान संपुष्टात आले.

या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आघाडीच्या फलंदाजांना चांगली कामगिरी न करता आल्याने छत्तीसगडची ३ बाद ४० अशी अवस्था होती. मात्र, कर्णधार हरप्रीत सिंग (८३) आणि अमनदीप खरे (नाबाद ५९) यांनी अप्रतिम खेळ करत छत्तीसगडचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. या डावाच्या ४६ व्या षटकात पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी छत्तीसगडची ६ बाद १९० अशी धावसंख्या होती.

- Advertisement -

मुंबईसमोर ४० षटकांत १९२ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. याचा पाठलाग करताना सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि आदित्य तरे यांनी मुंबईच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. मुंबईची ११.३ षटकांत बिनबाद ९५ अशी धावसंख्या होती. जैस्वालने ३८ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ६०, तर तरेने ३१ चेंडूत नाबाद ३१ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक – छत्तीसगड : ४५.४ षटकांत ६ बाद १९० (हरप्रीत सिंग ८३, अमनदीप खरे नाबाद ५९; धवल कुलकर्णी २/९) वि. मुंबई : ११.३ षटकांत बिनबाद ९५ (यशस्वी जैस्वाल नाबाद ६०, आदित्य तरे नाबाद ३१).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -