घरक्रीडाएकटा विराट कोहली काय करणार - अॅडम गिलक्रिस्ट

एकटा विराट कोहली काय करणार – अॅडम गिलक्रिस्ट

Subscribe

अॅडम गिलक्रिस्टच्या मते जर भारताला ही मालिका जिंकायची असेल तर विराट कोहली व्यतिरिक्त इतर फलंदाजांनाही चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. 

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा टी-२० सामना जिंकत ही मालिका १-१ अशी बरोबरीत संपवली. आता ६ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर नसल्यामुळे या मालिकेत भारताचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा महान यष्टीरक्षक अॅडम गिलक्रिस्टच्या मते जर भारताला ही मालिका जिंकायची असेल तर विराट कोहली व्यतिरिक्त इतर फलंदाजांनाही चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे.

कोहलीने कसोटीत चांगली कामगिरी केली नाही तर आश्चर्यच

गिलक्रिस्ट म्हणाला, “ऑस्ट्रेलियामध्ये विराट नेहमीच चांगले प्रदर्शन करतो. या कसोटी मालिकेतही तो २०१४ दौऱ्यासारखीच (४ कसोटी सामन्यांत ४ शतकांसह ६९४ धावा) दमदार कामगिरी करेल अशी मला अपेक्षा आहे. मी त्याच्याशी काही दिवसांपूर्वी बोललो होतो. त्याच्या वागण्याबोलण्यात खूप आत्मविश्वास होता. तसेच तो तिसऱ्या टी-२० सामन्यात ज्याप्रकारे खेळला त्यावरून त्याने फॉर्मात असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे त्याने जर कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली नाही तर मला आश्चर्य होईल. पण तो एकटा भारताला ही मालिका जिंकवून देऊ शकत नाही. जर भारताला ही मालिका जिंकायची असेल तर त्यांच्या बाकीच्या फलंदाजांनाही आपला खेळ उंचवावा लागेल. ते जर चांगले खेळले तरच भारताच्या गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या २० विकेट घेण्याची संधी मिळेल.”

दोन्ही संघांकडे अप्रतिम गोलंदाज 

स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर हे दोघे नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कमकुवत झाली आहे. पण त्यांची गोलंदाजी अजूनही मजबूत आहे. त्यांच्याकडे मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि नेथन लायन असे घातक गोलंदाज आहेत. तर भारताच्या गोलंदाजांनीही गेल्या काही काळात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे गिलक्रिस्टच्या मते जो संघ जास्त चांगली फलंदाजी करेल तो संघ ही मालिका जिंकले. “या दोन्ही संघांकडे अप्रतिम गोलंदाज आहेत. त्यामुळे या मालिकेत जो संघ चांगली फलंदाजी करेल तो संघ जिंकेल. भारताच्या फलंदाजांनी द.आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात सातत्यपूर्ण प्रदर्शन केले नव्हते. त्यांनी कधी चांगली फलंदाजी केली, तर कधी त्यांची फलंदाजी अतिशय वाईट होती. जर या मालिकेतही त्यांनी अशीच कामगिरी केली तर ते ही मालिका जिंकणार नाहीत.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -