घरक्रीडाडीआरएसमध्ये सातत्याचा आभाव

डीआरएसमध्ये सातत्याचा आभाव

Subscribe

भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यानंतर डिसिजन रिव्युव्ह सिस्टमवर (डीआरएस) टीका केली. अ‍ॅष्टन टर्नरने ४३ चेंडूंत ८४ धावा करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, ३५९ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला ३९ चेंडूंत ६६ धावांची गरज होती.

त्यावेळी युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर टर्नरचा यष्टीरक्षक रिषभ पंतने झेल पकडला. मात्र, पंचांनी टर्नरला नाबाद ठरवले. त्यामुळे भारताने डीआरएसचा वापर केला. स्निको मीटरमध्ये चेंडू टर्नरच्या बॅट जवळून गेल्यावर हालचाल झाली. मात्र, तरीही तिसर्‍या पंचांनी टर्नरला नाबाद ठरवले. याबाबत सामन्यानंतर कोहलीने नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

डीआरएसचा निर्णय माझ्यासाठी आश्चर्यकारक होता. डीआरएसमध्ये सातत्याचा आभाव आहे. प्रत्येक सामन्यानंतर डीआरएसबाबत चर्चा होते. डीआरएसच्या त्या निर्णयामुळे हा सामना पूर्णपणे फिरला. मात्र, याबाबत आम्ही काही करू शकत नाही. या सामन्यात क्षेत्ररक्षणात आम्ही खूप चुका केल्या, याबाबत आम्ही काहीतरी करू शकतो. या सामन्यात आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ केला नाही.

क्षेत्ररक्षणात आम्हाला ज्या संधी मिळाल्या, त्यांचा आम्ही उपयोग करू शकलो नाही. मात्र, ऑस्ट्रेलियालाही श्रेय दिले पाहिजे. त्यांनी आमच्यापेक्षा चांगला खेळ केला आणि हा सामना जिंकला, असे कोहली म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -