घरक्रीडा'हा' माजी खेळाडू म्हणतोय धोनीचं पुनरागमन अशक्य

‘हा’ माजी खेळाडू म्हणतोय धोनीचं पुनरागमन अशक्य

Subscribe

टी-२० सामन्यांमध्ये लोकेश राहुल आणि रिषभ पंत हे दोघेजण यष्टीरक्षण करताना दिसत आहेत. त्यामुळे निवड समिती टी-२० विश्वचषक पाहता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करु शकते.

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुर आहे. धोनीचे पुनरागमन हे धोनीच्या आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून असेल, असे मत भारतीय निवड समितीने म्हटले होते. दरम्यान, सध्या देशावर करोनाचे संकट असल्यामुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही तर, आयपीएल स्पर्धा रद्द करावी लागेल, असे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला. त्यामुळे धोनीला आयपीलमध्ये चांगली कामगिरी करण्याच्या संधीला मुकावे लागणार आहे. दरम्यान, आता भारताचा माजी सलामीचा फलंदाज विरेंद्र सेहवागने धोनीच्या पुनरागमनावर मत व्यक्त केले आहे.


हेही वाचा – करोनाला मारण्यासाठी हवेत औषध फवारणी?

ज्यावेळी निवड समिती एका खेळाडूला डावलून पुढे जाते. त्यावेळी त्याच्या नावाचा पुन्हा विचार ते करत नाही. जरी धोनीने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तरी धोनीला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण आता टी-२० सामन्यांमध्ये लोकेश राहुल आणि रिषभ पंत हे दोघेजण यष्टीरक्षण करताना दिसत आहेत. त्यामुळे निवड समिती टी-२० विश्वचषक पाहता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करु शकते. त्यामुळे या दोघांना बाजूला सारून निवड समिती टी-२० विश्वचषकासाठी धोनीचा विचार करेल, असे मला तरी वाटत नाही. त्यामुळे धोनीचे भारतीय संघातील पुनरागमन शक्य नसल्याचे मला वाटते, असे सेहवाग म्हणाला.

- Advertisement -

धोनीने आयपीएलसाठी चेन्नईत १ मार्चपासून सराव देखील सुरू केला. पण करोनामुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. यामुळे सराव बंद करुन धोनी आपल्या घरी रांची येथे गेला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -