घरक्रीडाZerodha च्या संस्थापकाने चीटिंग करून हरवल्याचे मान्य केल्यावर विश्वनाथन आनंदची प्रतिक्रिया, म्हणाला...

Zerodha च्या संस्थापकाने चीटिंग करून हरवल्याचे मान्य केल्यावर विश्वनाथन आनंदची प्रतिक्रिया, म्हणाला…

Subscribe

आनंदच्या या ट्विटला उत्तर देताना कामतने पुन्हा त्याची माफी मागितली.

चेस.कॉमने आयोजित केलेल्या ‘चेकमेट कोविड’ या बुद्धिबळाच्या एका चॅरिटी स्पर्धेत बऱ्याच लोकप्रिय व्यक्तींचा सहभाग होता. या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरला तो पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद. आनंद हा भारताचा सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू मानला जातो. परंतु, या चॅरिटी स्पर्धेत आनंदचा झिरोधा (Zerodha) या आर्थिक सेवा देणाऱ्या कंपनीचा सहसंस्थापक निखिल कामतने पराभव केला होता. या निकालाचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. मात्र, हा विजय मिळवण्यासाठी चीटिंग केल्याचे स्वतः कामतने नंतर ट्विट करून मान्य केले. आनंदला पराभूत करण्यासाठी कॉम्प्युटर आणि तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेतल्याचे कामत त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. त्याच्या या ट्विटवर आनंदने प्रतिक्रिया दिली.

केवळ पटावरील परिस्थितीप्रमाणे खेळत गेलो

लोकांसाठी मदतनिधी उभारण्याकरिता प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला होता. खेळाच्या नीतिमूल्यांचे समर्थन करत हा अनुभव वेगळा आणि आनंद देणारा होता. मी केवळ पटावरील परिस्थितीप्रमाणे खेळत गेलो. प्रत्येकानेच तसे करावे, अशी अपेक्षा मला अपेक्षा होती, असे आनंद त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.

- Advertisement -

कामतने पुन्हा मागितली माफी 

आनंदच्या या ट्विटला उत्तर देताना कामतने पुन्हा त्याची माफी मागितली. आम्हा नवशिक्यांना भारताच्या सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटूविरुद्ध खेळून लोकांसाठी मदतनिधी उभारण्याची संधी मिळत आहे, केवळ मी इतकाच विचार करत होतो. परंतु, मी जे केले, ते चुकीचे होते. मी त्यासाठी मनापासून माफी मागतो, असे कामत म्हणाला. त्याआधी सोमवारी कामतने आनंदचा पराभव करताना चीटिंग केल्याचे मान्य केले होते. बुद्धिबळाच्या सामन्यात मी आनंद सरांचा पराभव केला, यावर काही लोकांचा खरेच विश्वास बसला आहे. परंतु, हे शक्य नाही. मी आनंद सरांचा पराभव करण्यासाठी कॉम्प्युटर आणि तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेतल्याचे कामत म्हणाला होता.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -