घरक्रीडाWTC Final : भारतीय संघ दिसणार रेट्रो जर्सीत! जाडेजाने शेअर केला फोटो

WTC Final : भारतीय संघ दिसणार रेट्रो जर्सीत! जाडेजाने शेअर केला फोटो

Subscribe

ही जर्सी ९० च्या दशकातील भारतीय संघाच्या जर्सीकडून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यामध्ये पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. साऊथहॅम्पटन येथे १८ ते २२ जून या कालावधीत होणाऱ्या या सामन्यामध्ये भारतीय संघ विशेष ‘रेट्रो जर्सी’ परिधान करणार आहे. भारताचा डावखुरा अष्टपैलू रविंद्र जाडेजाने भारतीय संघाच्या रेट्रो जर्सीवर घालण्यात येणाऱ्या स्वेटरसह आपला फोटो सोशल मीडियावरून शेअर केला. ही जर्सी ९० च्या दशकातील भारतीय संघाच्या जर्सीकडून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहे. जाडेजाने परिधान केलेल्या स्लिव्हलेस स्वेटरवर कोणत्याही कंपनीचा लोगो नाही.

कोणत्याही कंपनीचा लोगो नाही

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ही आयसीसीची जागतिक स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेत कोणत्याही संघाला कोणत्याही कंपनीचा लोगो मध्यभागी लावण्याची परवानगी नाही. जाडेजाने परिधान केलेल्या स्वेटरच्या एका कोपऱ्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI), तर दुसऱ्या कोपऱ्यात आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपचा लोगो आहे. तसेच मध्यभागी इंडिया असे लिहिले आहे.

- Advertisement -

आयसीसीने केली नियमांची घोषणा 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला १८ जूनपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीने शुक्रवारी नियमांची घोषणा केली होती. हा सामना अनिर्णित राहिला किंवा बरोबरीत संपल्यास भारत आणि न्यूझीलंडला संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येईल. भारतीय संघ सध्या मुंबईत क्वारंटाईन असून २ जूनला इंग्लंडसाठी रवाना होणार आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -