घरक्रीडाYuvraj Singh Birthday : सिक्सर किंगला' ४० वर्ष पूर्ण; त्याचा विश्वविक्रम आजही...

Yuvraj Singh Birthday : सिक्सर किंगला’ ४० वर्ष पूर्ण; त्याचा विश्वविक्रम आजही आहे अविस्मरणीय

Subscribe

१२ डिसेंबर १९८१ ला चंदीगडमध्ये जन्मलेल्या युवराज सिंगचा रविवारी १२ डिसेंबर २०२१ रोजी ४० वा वाढदिवस आहे

भारतीय संघात असे खूप कमी खेळाडू पहायला मिळतात ज्यांच्या वडिलांनीही देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळले आहे आणि पुन्हा त्यांच्या मुलानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भाग घेतला आहे. भारतीय संघात अशी खूप कमी नावे आहेत. ज्याच्यात वडिलांनी आणि त्यांच्या मुलाने देशासाठी क्रिकेट खेळले आहे. मात्र भारतीय संघात सर्वात जास्त चर्चेत राहिला आणि त्याचा सर्वत्र नावलौकिक आहे त्यामध्ये युवराज सिंगचा समावेश केला जातो. युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांचा देखील देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटमध्ये सहभाग राहिला आहे.

१२ डिसेंबर १९८१ ला चंदीगडमध्ये जन्मलेल्या युवराज सिंगचा रविवारी १२ डिसेंबर २०२१ रोजी ४० वा वाढदिवस आहे. तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत नेहमीच काहीना काही कारणास्तव सतत चर्चेत राहिला आहे. सोबतच युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिंक्स किंग म्हणून देखील ओळख आहे. त्याने आंतरारष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला आहे. सिक्सर किंग नावाने प्रसिध्द असलेल्या युवराज सिंगने मोठ्या कालावधीपासून देशासाठी क्रिकेट खेळले आहे आणि तो यशस्वी देखील झाला आहे. मात्र कॅन्सरमुळे तो अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता तरी देखील नंतर तो परतला आणि पुन्हा संघाचा भाग बनला.

- Advertisement -

ICC स्पर्धेचा सर्वात मोठा हिरो

१९ वर्षाखालील क्रिकेट खेळत असतानाच समजले होते की युवराज आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात मोठा हिरो आहे. २००२ मध्ये त्याने देशासाठी १९ वर्षाखालील विश्वचषक मोहम्मद कैफच्या नेतृत्वात खेळला होता. २००२ च्या विश्वचषकात युवराजला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले होते. तर आयसीसी टी-२० विश्वचषक २००७ मध्ये त्याने एका षटकात ६ षटकार लगावून इतिहास रचला होता. यासोबतच २०११ ला भारतात झालेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात युवराजला ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ घोषित करण्यात आले होते. मात्र त्याच विश्वचषकादरम्यान त्याला कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली होती.

- Advertisement -

युवराज सिंगचे करियर

फिरकीपटू अष्टपैलू युवराज सिंगने वर्ष २००० मध्ये एकदिवसीय आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने २०१७ पर्यंत ३०४ एकदिवसीय सामने खेळले. त्याने २७८ डावात १४ शतके आणि ५२ अर्धशतकांसोबत ८७०१ धावा केल्या. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १६१ सामन्यांत १११ बळी पटकावले. यासोबतच त्याने कसोटी क्रिकेटमध्येही २००३ मध्ये पदार्पण केले आणि २०१२ पर्यंत त्याने ४० सामने खेळले. त्यामध्ये त्याच्या नावावर ३ शतक आणि ११ अर्धशतकांच्या जोरावर एकूण १९०० धावांची नोंद आहे आणि सोबतच त्याने ९ बळी घेतले आहेत. दरम्यान, २००७ ते २०१७ पर्यंत युवराज सिंगने ५८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने ८ अर्धशतकांसह ११७७ धावा केल्या आणि ३१ डावात २८ बळी घेतले.


हे ही वाचा : http://IND vs SA : भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ५० दिवस बायो-बबलमध्ये असणार; दौऱ्यापूर्वी मुंबईत क्वारंटाईन


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -