घरटेक-वेक२१ मेला लाँच होणार बजेट स्मार्टफोन Moto G8 Power Lite

२१ मेला लाँच होणार बजेट स्मार्टफोन Moto G8 Power Lite

Subscribe

मोटोरोला भारतात नवीन बजेट स्मार्टफोन Motorola G8 Power Lite बाजारात आणण्याची तयारी करत आहे.

मोटोरोलाने अलीकडेच Moto Edge+ भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये १०८ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. आता कंपनी भारतात नवीन बजेट स्मार्टफोन बाजारात आणण्याची तयारी करत आहे. Motorola G8 Power Lite २१ मे रोजी भारतात लाँच केला जाणार आहे. कंपनी ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून त्याची विक्री करणार आहे. गेल्या वर्षी या फोनला ब्राझीलमध्ये लाँच करण्यात आलं होतं.

Motorola G8 Power Lite या स्मार्टफोनची बॅटरी 5,000mAh आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio P35 चिपसेटवर चालतो. यात 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. फोनमध्ये एलसीडी डिस्प्ले आहे आणि तो एचडी आहे. स्मार्टफोनसह 10W चार्जर देखील देण्यात आला आहे त्यामुळे वेगाने चार्जिंग होईल.

- Advertisement -

हेही वाचा – सर्वात स्वस्त ७ सीटर कार BS6 Datsun GO+ लाँच, किंमत ४.१९ लाखांपासून सुरू


Motorola G8 Power Liteमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मुख्य कॅमेरा 16MP सह 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय डेप्थ सेन्सिंग कॅमेरादेखील आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 8MPचा कॅमेरा आहे. Motorola G8 Power Liteच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. या फोनची किमत १०,००० रुपयांपर्यंत असू शकते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -