घरटेक-वेकवनप्लसचे सह-संस्थापक कार्ल पे यांनी सुरु केली नवी कंपनी, नाव ठेवलं 'Nothing'

वनप्लसचे सह-संस्थापक कार्ल पे यांनी सुरु केली नवी कंपनी, नाव ठेवलं ‘Nothing’

Subscribe

वनप्लसचे (One Plus) सह-संस्थापक कार्ल पे (Carl pei) यांनी नुकतंच वनप्लस कंपनीला रामराम ठोकला आहे. कंपनी सोडल्यानंतर कार्ल पे यांनी नविन कंपनी सुरु केली आहे. कार्ल पे यांच्या नव्या उपक्रमाची बरेच दिवस चर्चा सुरु होती. अखेर कार्ल पे यांनी त्यांच्या कंपनीची अधिकृतरित्या घओषणा केली आहे. कार्ल पे यांनी नवीन कंपनीला नथिंग (Nothing) असं नाव दिलं आहे. वाचायला जरी विचित्र वाटत असलं तरी, परंतु हे खरे आहे की कार्ड पे यांच्या नवीन कंपनीचं नाव नथिंग आहे. नावाचा मराठी अर्थ ‘काहीही नाही’ असा आहे.

कंपनीच्या या अनोख्या नावाबद्दल, कार्ल पे म्हणाले की या नावामागील हेतू म्हणजे असं तंत्रज्ञान आणणं जे लोकांच्या जीवनात प्रभाव असूनही अदृश्य राहिल. पे म्हणाले, आम्हाला विश्वास आहे की सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान सुंदर आहे. अदृश्य तंत्रज्ञानाचा अर्थ असा नाही की प्रोडक्ट दिसणार नाही, परंतु असं काहीतरी असलं पाहिजे जे वेगळे असेल.

- Advertisement -

कार्ल पे यांच्या नवीन कंपनीची घोषणा केली गेली आहे, परंतु कार्ल पे यांच्या नवीन कंपनीकडून स्मार्ट डिव्हाइस अपेक्षित आहेत. मात्र कंपनी कोणती उत्पादने तयार करेल याबद्दल माहिती नाही. कार्ल पे यांची कंपनी भारतात देखील त्यांचे प्रोडक्ट्स लाँच करेल. दरम्यान, सीआरईडीचे संस्थापक कुणाल शहा यांनीही कार्ल पे यांच्या नथिंग कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे, परंतु गुंतवणूकीच्या रकमेबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. कार्ल पे यांच्या नव्या उपक्रमात गुंतवणूक करणारे कुणाल शहा हे पहिले भारतीय आहेत.

या गुंतवणूकीबद्दल शहा यांनी आपल्या एका निवेदनात म्हटलं होतं की, “कार्ल ग्राहक इलेक्ट्रॉनिक कंपनीवर काम करत आहेत. ज्यामुळे टेक इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ माजेल. त्यांचा एक भाग होण्यासाठी आम्ही खूप उत्साही आहोत.”

- Advertisement -

कार्ल पे यांना या कंपनीसाठी सत्तर लाख डॉलर्स म्हणजेच ७० लाख डॉलर्स एवढा निधी प्राप्त झाला आहे. कार्ल पे यांना मिळालेल्या निधीत टोनी फॅडेल, प्रसिद्ध यूट्यूबर केसी निस्टाट, ट्विचचे सह-संस्थापक केव्हिन लिन, रेडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यासारख्या नामांकित व्यक्तींचा समावेश आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -