Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक Honda ची सर्वाधित लोकप्रिय बाईक Honda Shine झाली महाग, जाणून घ्या नवीन...

Honda ची सर्वाधित लोकप्रिय बाईक Honda Shine झाली महाग, जाणून घ्या नवीन किंमत

Related Story

- Advertisement -

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने भारतीय बाजारातील सर्वाधित व्रिक्री होणारी Honda Shine बाईच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने या बाइकची किंमत १ हजार ०७२ रुपयांनी वाढवली आहे, त्यामुळे Honda Shine च्या ड्रम ब्रेक व्हेरियंटची किंमत आता ७१ हजार ५५० रुपये झाली आहे. तर डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत 76,346 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. कंपनीने ही बाइक फेब्रुवारी महिन्यात नवीन बीएस-6 इंजिनसह लाँच केली होती. बीएस-6 इंजिनमध्ये लाँच केल्यापासून कंपनीने दुसऱ्यांदा या बाइकच्या किंमतीत वाढ केली आहे. होंडा शाइन ही बाइक आपल्या सेगमेंटमधील बेस्ट सेलिंग बाइकपैकी एक आहे.

 बाईकर सुरु आहे कॅशबॅक ऑफर

विषेश बाब म्हणजे कंपनीने ग्राहकांसाठी सध्या या बाइकवर ५ टक्के कॅशबॅकची (जास्तीत जास्त ३५०० रुपये) ऑफर दिली आहे. परंतु कंपनीची ही कॅशबॅक ऑफर फक्त SBI क्रेडिट कार्ड होल्डर्ससाठी आहे. या ऑफरचा लाभ फक्त EMI ट्रांजेक्शनवरच देण्यात येईल. या सवलतीचा फायदा घेण्यासाठी कमीत कमी ४० हजार रुपये ट्रांजेक्शन करणे गरजेचे आहे. पण हे ट्रांजेक्शन EMI द्वारे करणे गरजेचे आहे. या कॅशबॅकचा फायदा फक्त ३० जून २०२१ पर्यंत घेता येणार आहे.

65 KMPL पर्यंत बाइकचे माइलेज

- Advertisement -

Honda Shine बाइकला 125 CC चे इंजिन देण्यात आले आहे जे 7,500 rmp वर 10.72 bhp पावर आणि 6,000 rmp वर 10.9 Nm पीक टॉर्क जनरेट करते. तसेच इंजिनला 5 स्पीड गियरबॉक्स जोडण्यात आले आहे. ARAI च्या म्हणण्यानुसार, Honda Shine ही बाइक 65 किमी प्रति लीटर मायलेज देते. यातच एप्रिल महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या बाईकपैकी Honda Shine बाइक एक आहे.

Honda Shine चे फीचर्स

Honda Shine बाइकचे ब्लॅक, ग्रे, निळा आणि लाल असे चार रंगाचे पर्याय दिले आहेत. संपूर्ण LED हेडलाइट आणि पूर्ण डिजिटल कंसोल सारखी बरेच आधुनिक फीचर्स देण्यात आलेले नाहीत. यातील इंस्ट्रमेंट कंसोल अतिशय बेसिक आहे. ज्यात स्पीड, ओडो आणि फ्यूल गेज सारखी माहिती मिळते. सोबतच साइलेंट स्टार्ट, DC हेडलँप, इंजिन किल स्विच आणि अडजस्टेबल सस्पेंशन देण्यात आले आहे. ही बाइक हीरो सुपर स्प्लेंडर आणि बजाज पल्सर 125 यांच्याशी थेट स्पर्धा करते.


देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ‘डेल्टा’ व्हेरियंटचं जबाबदार, संशोधकांचा दावा


- Advertisement -

 

- Advertisement -