Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन अभिनेत्री सौम्या टंडनवर फेक आयडी बनवून कोरोना लस घेतल्याच आरोप?

अभिनेत्री सौम्या टंडनवर फेक आयडी बनवून कोरोना लस घेतल्याच आरोप?

या सर्व अफवा पसरवण्यात येत असल्याचे सौम्याने कबूल केले आहे.

Related Story

- Advertisement -

कोरोना लसीकरणाची मोहीम देशभरामध्ये वेगाने सुरू आहे. कोरोना लसीच्या अभावापायी अनेक लोकांचे लसीकरण होणे बाकी आहे. याचदरम्यान खोटे ओळखपत्र तयार करून लोकं लस घेत असल्याची  माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री मीरा चोप्राने बनावट ओळखपत्र तयार करून कोरोना लस घेतल्याची बातमी समोर आली होती. मीरा नंतर आता ‘भाभिजी घर पर है’ या परसिद्ध मालिकेत ‘अनीता भाभी’हे पात्र साकारणारी पूर्व अभिनेत्री सौम्या टंडनने देखील असेच कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या बातम्या पसरल्या नंतर सौम्याने ट्विटरवर स्पष्टीकरण दिले आहे. या सर्व अफवा पसरवण्यात येत असल्याचे सौम्याने कबूल केले आहे.

- Advertisement -

काय लिहलं आहे सौम्याने ट्विट मध्ये
“काही माध्यमांमध्ये अफवा पसरवली जात आहे की, मी ठाणे सेंटरमध्ये कोरोना लसीकरणाचा डोज घेतला आहे. मी कोरोना लसीचा डोज घेतला आहे पण माझ्या घरच्या बाजूला असणार्‍या सेंटर मध्ये. काही माध्यमाद्वारे असा दावा करण्यात आल आहे. आणि हि बातमी पूर्णतः खोटी आहे. कृपया खर्‍या बातमी आणि पुराव्यांवर विश्वाश ठेवा”
सौम्याने ट्विट केल्यानंतर एका युजरने एक आयडी आणि फोटो पोस्ट करत “हे खरे आहे की खोटे?”सौम्याला प्रश्न विचारला. सौम्याने याचे उत्तर ‘हे बनावट व खोटे आहे’ असे दिले.


- Advertisement -

हे हि वाचा – प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचा मॉर्फ पॉर्न व्हिडीओ होतोय व्हायरल, पोलिस निर्मात्याच्या शोधात

- Advertisement -